मुंबई : सध्या मधुमेह आणि रक्तदाब या आजारांनी अनेक जण त्रस्त असलेले दिसतात. दिवसेंदिवस याचे प्रमाण वाढत चालले आहे. आरोग्याच्या दृष्टीने ही चिंताजनक गो
मुंबई : सध्या मधुमेह आणि रक्तदाब या आजारांनी अनेक जण त्रस्त असलेले दिसतात. दिवसेंदिवस याचे प्रमाण वाढत चालले आहे. आरोग्याच्या दृष्टीने ही चिंताजनक गोष्ट आहे. अशात याच आजारांसबंधी धक्कादायक माहिती समोर आली आहे. आजवर मधुमेह आणि उच्चरक्तदाबाच्या समस्या पन्नाशी गाठलेल्यांमध्ये दिसत होत्या. मात्र मुंबई महानगरपालिकेने नुकत्याच सादर केलेल्या अहवालानुसार 13 हजार शाळकरी मुलांना या आजारांनी ग्रासल्याचे दिसून येत आहे.
रक्तात साखर जास्त होणे किंवा रक्तदाबावर परिणाम होणे हे आजार वयानुसार होत होते. मात्र आता शाळकरी मुलांमध्ये हा आजार दिसत आहे. पालिकेने दिलेला हा अहवाल सप्टेंबर 2022 पासूनचा आहे. मधुमेह आजारासाठी पालिकेने 2 लाख 71 हजार 583 हजार विद्यार्थ्यांची तपासणी केली होती. तर रक्तदाबासाठी 2 लाख 82 हजार 919 विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली. यात तब्बल 13 हजार विद्यार्थांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत. मुंबई महानगरपालिका शाळांमधील 5 हजार 328 विद्यार्थ्यांना मधुमेह, तर 8 हजार 158 विद्यार्थ्यांना उच्च रक्तदाब असल्याची धक्कादायक माहिती पालिकेने दिली आहे. यात पालिकेने या अवहालावर पालकांना विद्यार्थांच्या आहाराची तसेच व्यायामाची काळजी घेण्यास सांगितले आहे. शाळकरी मुलांचे आरोग्य अशा पध्दतीने बिघडण्यामागे सध्याची जीवनशैली जबाबदार असल्याचे समजते.
COMMENTS