Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

ठाकरे गटाचे 12 ते 13 आमदार संपर्कात

शिंदे गटाचे नेते उदय सामंत यांचा गौप्यस्फोट

मुंबई प्रतिनिधी - शिवसेना नेते उद्धव ठाकरे, संजय राऊत यांच्यानंतर सुषमा अंधारे यांनी राज्यात मध्यावधी निवडणुका होण्याची शक्यता वर्तवली आहे. याच

उदय सामंतावरील हल्ला प्रकरणात 6 जणांना पोलीस कोठडी.
आमदार उदय सामंत हल्ला प्रकरण.
जत तालुक्यासाठी ’एमआयडीसी’

मुंबई प्रतिनिधी – शिवसेना नेते उद्धव ठाकरे, संजय राऊत यांच्यानंतर सुषमा अंधारे यांनी राज्यात मध्यावधी निवडणुका होण्याची शक्यता वर्तवली आहे. याचा समाचार घेतांना शिंदे गटाचे नेते आणि उद्योगमंत्री उदय सामंत म्हणाले की, मध्यावधी निवडणुका होण्याची गरज पडणार नाही. आमच्याकडे 170 आमदारांचे संख्याबळ आहे. ठाकरे गटातील अजून 12 ते 13 आमदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संपर्कात आहेत, असा गौप्यस्फोट उदय सामंत यांनी केला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
ठाकरहे गटातील 12 ते 13 आमदार आमच्या संपर्कात असल्याने ही संख्या 182 वर जाणार आहे. त्यामुळे मध्यावधी निवडणुकांचा प्रश्‍नच येत नाही. निवडणुका वेळेवरच होतील, असं सांगतानाच आपल्याकडील आमदार टिकून राहावेत म्हणून अशी विधाने केली जात आहे, असा टोला उदय सामंत यांनी लगावला. प्रत्येक फुटीर गटात एक शिंदे असतोच, असे विधान संजय राऊत यांनी केले होते. राऊत यांच्या या विधानाचा त्यांनी समाचार घेतला. हे करण्याएवढे आम्ही बालवाडी किंवा शाळेत जात नाही. आम्ही देखील चार चार वेळा निवडून आलो आहोत. आमच्यासोबत 50 सीनियर आमदार आहेत. त्यामुळे अशा विधानांनी कोणी विचलीत होणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. शिवसेनेच्या संस्थापकांपैकी एक खासदार गजानन कीर्तिकर यांनी बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. या धक्क्यातून सावरण्यासाठीच त्यांनी बेताल विधाने करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे, असे त्यांनी सांगितले. अमोल कीर्तिकर तिकडे राहिले आणि गजानन कीर्तिकर इकडे आले या कौटुंबिक गोष्टीवर मला बोलायचे नाही. हा त्यांचा वैयक्तिक प्रश्‍न आहे. मात्र, गजानन कीर्तिकर यांनी घेतलेल्या निर्णयामुळे अनेकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे, असा चिमटा त्यांनी काढला.

सुषमा अंधारेंचे विभक्त पती शिंदे गटात – शिवसेनेमध्ये काही दिवसांतच आपली स्वतंत्र ओळख निर्माण करणार्‍या सुषमा अंधारे यांची कोंडी होण्याची शक्यता आहे. कारण सुषमा अंधारेंचे विभक्त पती वैजनाथ वाघमारे यांनी शिंदे गटात दाखल झाले आहे. वाघमारे यांना शिंदे गटात मोठे पदही दिले जाणार असल्याची चर्चा आहे. तर सुषमा अंधारे यांचे विभक्त पती वैजनाथ वाघमारे यांनी सुषमा अंधारे यांना थेट इशारा देत त्यांच्याविरोधात निवडणूक लढवणार असल्याचे म्हटले आहे. शिवाय लवकरच सुषमा अंधारे यांचा पर्दाफाश करणार असल्याचा इशारा वाघमारे यांनी दिलाय.

COMMENTS