श्री मल्लिकार्जुन मंदिर रस्त्यालागतचे फोडलेले बल्ब पुन्हा लावण्यास सुरवात

Homeमहाराष्ट्र

श्री मल्लिकार्जुन मंदिर रस्त्यालागतचे फोडलेले बल्ब पुन्हा लावण्यास सुरवात

श्री मल्लिकार्जुन देवस्थान सेवा मंडळाने मंदिराकडे जाणार्‍या रस्त्यालागत गेल्या दोन वर्षात खांबावर बल्ब लावले होते.

राज ठाकरेंचे ट्वीट; शिंदेना अभिनंदन आणि सावधानतेचा इशारा.
हे तर पळ काढण्यासाठी बळ वापरणारे सरकार…भाजपचा ठाकरे सरकारवर ठपका
धनंजय मुंडे रात्री उशिरा ’सागर’ बंगल्यावर

इस्लामपूर / प्रतिनिधी : श्री मल्लिकार्जुन देवस्थान सेवा मंडळाने मंदिराकडे जाणार्‍या रस्त्यालागत गेल्या दोन वर्षात खांबावर बल्ब लावले होते. पहाटेच्या वेळी दर्शनासाठी जाणार्‍या भक्तांना याचा चांगला उपयोग होत होता. मात्र, आठवड्या भरापूर्वी काही समाजकंठकाकडून हे बल्ब फोडण्यात आले होते. मात्र, सेवामंडळ सदस्यांनी 2 दिवसांपूर्वी पुन्हा नवीन बल्ब लावण्यास सुरुवात केली आहे. काही ठिकाणी वायरी तोडल्यामुळे त्याच्या ही दुरुस्ती चे काम अजून चालू आहे. 

यासाठी काही दानशूर व्यक्तींनी देणगी देऊ केली आहे. या देणगीदारांमध्ये मल्लिकार्जुन सेवाभावी मंडळाचे शिवभक्त, बाबासो नायकवडी, किशोर पाटील, विजय पाटील, जगदीश पाटील, बाबासो महादेव पाटील, वसंत पाटील, गजानन पाटील यांचा समावेश आहे. देणगीदारांनी लगेच दुसर्‍या दिवशी उस्फूर्तपणे सर्व बल्ब देण्याची व्यवस्था केली व मल्लिकार्जुन सेवा मंडळाच्या सदस्यांनी लगेच ते खांबावर लावण्याची व्यवस्था केली, अशी माहिती सेवा मंडळाचे अध्यक्ष गोरक्षनाथ गुरव यांनी दिली.  

COMMENTS