शिक्षण संचालनालय यांनी नुकतेच एक परिपत्रक काढले आहे
म्हसवड / वार्ताहर : शिक्षण संचालनालय यांनी नुकतेच एक परिपत्रक काढले आहे, की जिल्हा परिषद शाळेतील मुलांना शालेय पोषण आहाराची रक्कम विद्यार्थ्याच्या नावे जमा करणार त्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याचे राष्ट्रीयकृत बँकेत झिरो बॅलसने खाते काढावीत, असे आदेश पारित केल्याने पालकांची द्विधा आवस्था झाली आहे.
राष्ट्रीय कृत बॅकेत खाते काढायला गेल्यास झिरो बॅलसने खाते काढले तरी खात्यात कमीत कमी एक हजार रूपयाचा भरणा करण्यास सांगतात. सद्या कोवीड सदृष्य परिस्थितित बँकेत जाणे व ते ही मुलांना बरोबर घेऊन जाणे मोठे जोखमीचे व भितीदायक स्वरूपाचे आहे. त्याच बरोबर सध्या शेतीच्या मशागतीची कामे सुरू असून पालकांना बॅकेत जाऊन दिवसभर तिष्ठत बसावे लागते. बॅकेत रांगेत ऊभे राहून नंबर आला की सांगतात नवीन खाते लगेच निघणार नाही. झिरो बॅलसने खाते काढले तरी खात्यात किमान एक हजार रूपये बॅलन्स ठेवा, आशा विचित्र परिस्थितीमुळे पालक त्रस्त झाले आहेत.
विद्यार्थ्यांची बॅकेत खाती काढण्यापेक्षा शालेय पोषण आहाराची रक्कम मुख्याध्यापकाच्या नावे वर्ग करावी. संबंधित मुख्याध्यापकांनी ही रक्कम मुलांना द्यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे.
यामुळे पालकांचा व मुलांचा नाहक वेळ जाणार नाही. त्याच बरोबर सद्या कोरोनामुळे सर्वत्र लॉकडाऊन आहे. अशा परिस्थितीत पालक व मुलांना बॅकेत जाणे धोकादायक आहे. या सर्व बाबींचा विचार करून प्रशासनाने तातडीने निर्णय घेऊन शालेय पोषण आहाराची रक्कम मुख्याध्यापकांच्या नावे वर्ग करावी, अशी मागणी पालकांनी केली आहे.
COMMENTS