जिवलग मित्रानेच संयमी मित्राचा धारधार शस्त्राने केला खून

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जिवलग मित्रानेच संयमी मित्राचा धारधार शस्त्राने केला खून

कोल्हापुरातल्या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली

कोल्हापूर प्रतिनिधी - कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्याच्या प्रयाग चिखली गावात मित्रानेच मित्राचा खून केल्याची घटना घडली आहे.रात्री वडणगे फाटा ये

धक्‍कादायक..गळ्यावर वार करून चिमुरडीची हत्‍या
पोटच्या पोरीनच आईला संपवलं.
पाकिस्तानात क्रूरतेचा कळस.

कोल्हापूर प्रतिनिधी – कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्याच्या प्रयाग चिखली गावात मित्रानेच मित्राचा खून केल्याची घटना घडली आहे.रात्री वडणगे फाटा येथे खून झाल्याची घटना समोर आली. किरण दिनकर नाईक (वय 38) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. खुनानंतर स्वतः आरोपी पोलिसात हजर झाल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. खुनाच्या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेची नोंद करवीर पोलीस ठाण्यात झाली आहे. दरम्यान या खुनाच्या घटनेने चिखली परिसर हादरून गेला आहे.खुनाच्या प्रकारानंतर पोलिसांनी तपास सुरु केला असून काही धागेदोरे हाती लागतात का याचा शोध घेत आहे. मात्र, अद्याप खुनाचे कारण स्पष्ट झाले नाही.

COMMENTS