Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांचा राष्ट्रवादी तर्फे जाहीर निषेध

इस्लामपूर / प्रतिनिधी : राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या, संसदरत्न खा. सुप्रियाताई सुळे यांच्याबद्दल अर्वाच्य शब्द वापरून शिंदे-फडणवीस सरकारमधील

राष्ट्रवादी काँग्रेसकडून 1 एप्रिल मोदीजींच्या विकासाचा जन्मदिवस म्हणून साजरा
करहर-महू रस्त्यावर साईड पट्ट्या भरण्याचे काम जोमात
सातार्‍यात सापडली गुप्त होणारी मानवी कवटी; जिल्हा रुग्णालयातील अधिकार्‍यांना डोकेदुखी

इस्लामपूर / प्रतिनिधी : राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या, संसदरत्न खा. सुप्रियाताई सुळे यांच्याबद्दल अर्वाच्य शब्द वापरून शिंदे-फडणवीस सरकारमधील कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी राज्यातील महिलांचा अवमान केला आहे. शिंदे-फडणवीस यांनी त्यांचा 24 तासात राजीनामा घ्यावा, अन्यथा आम्ही हिसका दाखवून देवू, असा इशारा वाळवा तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने इस्लामपूर येथे देण्यात आला. यावेळी कार्यकर्त्यांनी अब्दुल सत्तार यांच्या निषेधाच्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला होता.
राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य सरचिटणीस अ‍ॅड. चिमण डांगे, तालुकाध्यक्ष विजयराव पाटील, प्रा. शामराव पाटील, जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब पाटील, संजय पाटील, शहराध्यक्ष शहाजीबापू पाटील, माजी नगराध्यक्ष पै. भगवान पाटील, प्रा. सौ. अरुणादेवी पाटील, माजी उपनगराध्यक्ष दादासो पाटील, महिला शहराध्यक्षा रोझा किणीकर, युवक तालुकाध्यक्ष संग्राम पाटील, कार्याध्यक्ष देवराज देशमुख, शहराध्यक्ष सचिन कोळी प्रामुख्याने उपस्थित होते.
याप्रसंगी विजयराव पाटील, अ‍ॅड. चिमण डांगे, महिला शहराध्यक्षा सौ. रोझा किणीकर, प्रा. सौ. अरुणादेवी पाटील यांनी निषेध केला.
शहाजीबापू पाटील यांनी हे घटनाबाह्य आणि घटना न मानणारे सरकार असल्याचा आरोप केला. दादासो पाटील यांनी या मंडळांचा जातीय दंगली घडविण्याचा डाव असल्याचा आरोप केला. यावेळी पै. भगवान पाटील, शंकरराव पाटील, संग्राम जाधव, देवराज देशमुख, युवक आष्टा शहराध्यक्ष शिवाजी चोरमुले, विद्यार्थी सेलचे विशाल माने, सुशांत कुराडे, युवती सेलच्या प्रियांका साळुंखे यांनीही अब्दुल सत्तार यांचा समाचार घेतला.

COMMENTS