Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

काँग्रेसची ‘भारत जोडो यात्रा’ ७ नोव्हेंबरपासून महाराष्ट्रात. 

अहमदनगर जिल्हयातून १००० युवक "भारत जोड़ो साठी' जाणार - राहुल उगले

जामखेड प्रतिनिधि - कन्याकुमारी येथून खा.राहुल गांधी(Rahul Gandhi) यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेली भारत जोडो यात्रा एतिहासिक ठरणार असून २०२४ च्य

भावाला वाचवायला गेलेल्या बहिणीचा मात्र मृत्यू
लाच प्रकरणातील पोलिसाला अखेर पोलिसांनी पकडले
रयतच्या शाळांतून एआय तंत्रज्ञान शिकविणार : खा. शरद पवार

जामखेड प्रतिनिधि – कन्याकुमारी येथून खा.राहुल गांधी(Rahul Gandhi) यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेली भारत जोडो यात्रा एतिहासिक ठरणार असून २०२४ च्या परिवर्तनाची सुरवात आहे. अहमदनगर जिल्हयातून १००० युवक  विधीमंडळ पक्षनेते माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आणि माजी प्रदेशाध्यक्ष युवक कॉंग्रेस सत्यजीत दादा तांबे यांच्या नेतृत्वाख़ाली भारत जोड़ो साठी दि.१८ व दि.१९ नोव्हेंबर रोजी शेगाव, बुलढाणा येथे जाणार आहेत. अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश युवक कॉंग्रेसचे सचिव राहुल उगले यांनी दिली.

         देगलूर जि. नांदेड येथे महाराष्ट्रात प्रवेश करत असून नांदेड, हिंगोली, वाशिम, अकोला व बुलढाणा या पाच जिल्ह्यातून १४ दिवस मार्गक्रमण करणार आहे. खा. राहुल गांधी यांच्या समवेत ११८ पूर्णवेळ पदयात्री असून राज्यातील ९ पदयात्रींचा त्यात समावेश आहे. पूर्णवेळ चालणाऱ्यांना ‘भारत पदयात्री’ म्हणून संबोधले जात असून राज्यातील ३७५ किमी अंतर चालणाऱ्यांना ‘राज्य पदयात्री’ म्हणून संबोधण्यात येत आहे. महाराष्ट्रात पदयात्रेचे एकूण १३ मुक्काम असून त्यापैकी नांदेड जिल्ह्यात ४, हिंगोली जिल्ह्यात ४, वाशिम जिल्ह्यात १. बुलढाणा ३ व अकोला १ असे मुक्काम असणार आहेत.

COMMENTS