बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट

बीड : मृग नक्षत्रातील पाऊस वेळेवर बरसल्यानं जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने पेरण्या केल्या. परंतु मागील काही दिवसात पावसाने ओढ दिली आणि शेतकरी च

Beed : बीड जिल्ह्यातील ईनामी देवस्थान जमिन गैरव्यवहार प्रकरणाची चौकशी करा (Video)
बीड जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर आक्रोश आंदोलन l LokNews24
बीड शहरातील ओढ्यातील व बिंदुसरा नदीपात्रात अनाधिकृत बांधकाम l LokNews24

बीड : मृग नक्षत्रातील पाऊस वेळेवर बरसल्यानं जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने पेरण्या केल्या. परंतु मागील काही दिवसात पावसाने ओढ दिली आणि शेतकरी चिंतेत आहे. जिल्ह्यात 86 टक्के पेरण्या पुर्ण झाल्यात. पाऊस पडेल या आशेवर शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या खऱ्या माञ आता पावसाने ओढ दिलीय, असं शेतकरी केशव पारधे यांनी सांगितलं.
जिल्ह्यात 7 लाख 91 हजार खरीपाचे क्षेत्र असून यावर्षी सोयाबीनचं क्षेत्र वाढलं आहे. मोठ्या आशेने शेतकऱ्यांनी खरिपाची पेरणी केली होती. मात्र, पावसाच्या ओढीने शेतकऱ्यांची चिंता वाढवलीय. बहुतांश शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या असल्या तरी आजही काही शेतकरी दमदार पावसानंतर पेरणी करणार असल्याचे सांगत आहेत. मागील आठवडाभरात केवळ दोन दिवस पाऊस झाला होता. त्यानंतर पुन्हा शेतकऱ्यांनी खुरपणी, कोळपणीचे काम सुरू केली आहेत. आता पाऊस झाला नाही तर मात्र पुन्हा दुबार पेरणी करावी लागेल या चिंतेत सध्या शेतकरी आहेत, असं दत्तात्रय मुंडे यांनी सांगितलंय. जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी पेरण्या करून घेतल्या नंतर पाऊस लांबणीवर पडलाय. ऊन सावलीचा खेळ सुरू असताना आता शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडे लागलेत. उसनवारी करून महागाईचे बी बियाणे खरेदी करून आपल्या काळया आईची ओटी भरली, आता वरून राजा मनसोक्त बरसावा आणि शेतकरी सुखावा अशीच इच्छा शेतकरी वर्ग व्यक्त करतोय.

जिल्ह्यावर दुष्काळाचं सावट
महाराष्ट्रात जून महिन्यात दरवर्षीपेक्षा मान्सून पावसानं हजेरी लावली. सुरुवातीच्या काळात झालेल्या पावसाच्या आधारावर शेतकऱ्यांनी काही ठिकाणी पेरणी केली होती. राज्यात जूनच्या तिसऱ्या आठवड्यानंतर पावसानं दडी मारली आहे. मान्सूननं दडी मारल्यानं राज्यातील 6 जिल्हे दुष्काळाच्या सावटाखाली आहेत. महाराष्ट्रातील औरंगाबाद, बीड,नंदुरबार,नाशिक अकोला धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

COMMENTS