Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सावंतवाडीत आठवड्यापासून बिबट्याचा मुक्काम

उंडाळे / वार्ताहर : जेमतेम वीस ते पंचवीस घरांची वाडी असलेल्या सावंतवाडी (ता. कराड) येथे गेल्या आठ-दहा दिवसांपासून बिबट्याने या वाडीतच मुक्काम ठोकल्या

स्व. एन. डी. पाटील यांच्या स्वप्नांच्या आड येणार्‍यांना धडा शिकवा : निशिकांत भोसले-पाटील
महिला शिक्षकांना त्रास देणार्‍या गटशिक्षणाधिकार्‍यांवर कारवाई करावी : नंदकुमार गोडसे
माण तालुक्यातील 13 हजार मुलांचे लसीकरण होणार

उंडाळे / वार्ताहर : जेमतेम वीस ते पंचवीस घरांची वाडी असलेल्या सावंतवाडी (ता. कराड) येथे गेल्या आठ-दहा दिवसांपासून बिबट्याने या वाडीतच मुक्काम ठोकल्याची परिस्थिती आहे. त्यामुळे सावंतवाडीकर ग्रामस्थ भीतीच्या छायेखाली वावरत आहेत. मात्र, वनविभाग ग्रामस्थांना नको ती कारणे देऊन बिबट्यासाठी सापळा लावण्यास टाळाटाळ करत असल्याने ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत.
एक-दोन महिन्यांपासून बिबट्याची नर-मादी व तिची तीन पिल्ले सावंतवाडी, खुडेवाडी, मनव, साळशिरंबे, नांदगाव, ओंड, उंडाळे संगम यासह परिसरात सातत्याने खाद्याच्या शोधात भटकत असल्याचे शेतकर्‍यांना दिसत आहेत. या बिबट्याने गेल्या आठ दिवसांपासून मनव येथील डांगे, दगडे वस्तीवर गत आठवड्यात दोन शेळ्या फस्त केल्या. याशिवाय डांगे वस्तीवर कोंबड्या, पाळीव कुत्री व भटकी कुत्री फस्त केली.
गत दोन दिवसांत या बिबट्याने सावंतवाडीतून सायंकाळी सहा ते सहाच्या दरम्यान भटकंती केली. याच वेळी हनुमंत सावंत यांच्या घराशेजारी त्याने चक्क ठिय्या मारला. तत्पूर्वी नजीकच्या घरातील एका शेळीवर त्याने झडप मारली. पण सुदैवाने शेळीच्या मालकाने व शेळीची हालचाल झाल्याने बिबट्याच्या तावडीतून शेळी निसटली. त्यामुळे ग्रामस्थ भयभीत झाले. ग्रामस्थांनी गावातून बिबट्या व तिची पिल्ले मुक्त संचार करत असल्याचे वन विभागाला कळवले. परंतू वनविभागाच्या अधिकार्‍यांनी या गोष्टीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत तो तुम्हाला काही करत नाही सापळा कुठे लावायचा? कसा लावायचा? असे प्रतिप्रश्‍न करून ग्रामस्थांत जखमेवर मीठ चोळले. याच भटकंतीनंतर रात्री साडेदहा वाजता या बिबट्याने पुन्हा गावात फेरफटका मारत गावातील पाळीव मांजरे व भटकी कुत्री फस्त करून तेथेच ठिय्या मारला. त्यामुळे ग्रामस्थांना रात्र जागून काढण्याची वेळ आली. या बिबट्याचा वनविभागाने सापळा लावून बंदोबस्त करणे गरजेचे आहे.

COMMENTS