ठाणे प्रतिनिधी - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी ठाण्यातील रायलादेवी तलाव आणि उपवन तलावाजवळील छठ पूजा कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली. यावेळी तु
ठाणे प्रतिनिधी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी ठाण्यातील रायलादेवी तलाव आणि उपवन तलावाजवळील छठ पूजा कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली. यावेळी तु्म्ही जसा मोठा कार्यक्रम केला आहे तसाच आम्ही पण एकाचा करेक्ट कार्यक्रम केल्याचा डायलॉग मारत मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. मुख्यमंत्र्यांचा हा डायलॉग ऐकूण एकच हशा पिकला. कार्यक्रमाला श्रीकांत शिंदे, प्रताप सरनाईक, रविंद्र फाटक आणि नरेश म्हस्के यांचीही उपस्थिती होती. एकनाथ शिंदे यांनी उत्तर भारतीय नागरिकांना संबोधित करत छठ पुजेच्या शुभेच्छाही दिल्या. तसेच तुम्हाला कोणी त्रास देणार नाही, सगळ्या सणांप्रमाणे हा सण देखील जोरात साजरा करायचा अस आवाहनही मुख्यमंत्र्यांनी नागरिकांना दिलं. तसेच आमच्या सरकारनं शेतकरी, महिला, कामगार सर्व वर्गासाठी आम्हा काम करत आहे. फक्त तीन महिन्यात 72 मोठे निर्णय घेतले आहेत. पेट्रोल पाच तर डिझेल तीन रुपयांनी कमी केले. कोणी प्रयत्न पण केले नाहीत असे निर्णय घेण्याचा, आम्ही निर्णय घेतला, असे एकनाथ शिंदेंनी म्हणत उद्धव ठाकरेंना विकास कामांवरून टोले लगावले.
COMMENTS