Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अनुष्का कुंभार यांचा जिल्हा क्रीडा कार्यालयाकडून सत्कार

सातारा / प्रतिनिधी : कुवेत येथे झालेल्या चौथ्या युथ एशियन मैदानी क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये अनुष्का दत्तात्रय कुंभार हिने 4 बाय 400 मी. रिलेमध्ये

गोव्याहून राजस्थानच्या दिशेने जाणार्‍या खाजगी बसला भीषण अपघात; बसमधील चालकासह सहाजण जखमी
निशिकांत भोसले-पाटील यांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क
कर्मकांडांना फाटा देत महात्मा जोतिबा फुले यांच्या सत्यशोधकी विचाराने रक्षाविसर्जन

सातारा / प्रतिनिधी : कुवेत येथे झालेल्या चौथ्या युथ एशियन मैदानी क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये अनुष्का दत्तात्रय कुंभार हिने 4 बाय 400 मी. रिलेमध्ये सुवर्ण व 400 मी. धावणे या प्रकारात कास्य पदक संपादन केल्याबद्दल श्रीमंत छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुल सातारा येथे जिल्हा क्रीडा अधिकारी युवराज नाईक यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी क्रीडा मार्गदर्शक बळवंत बाबर यांचाही सत्कार करण्यात आला. याप्रसंगी तालुका क्रीडा अधिकारी हितेंद्र खरात, क्रीडा अधिकारी सुनिल कोळी, कोल्हापूर शारिरीक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष आर. वाय. जाधव, मोहन पवार, अंकुश जांभळे, खेळाडू व पालक उपस्थित होते.

COMMENTS