वेळुंजे/हरसूल:देवचंद महाले : पर्यावरणावर होणारा सतत आघात, हा मानवाला हानीकारक तर आहेच, परंतु ज्या पर्यवरणात ना घर ना दार अशा पशु पक्षी व अन्य वन्य
वेळुंजे/हरसूल:देवचंद महाले : पर्यावरणावर होणारा सतत आघात, हा मानवाला हानीकारक तर आहेच, परंतु ज्या पर्यवरणात ना घर ना दार अशा पशु पक्षी व अन्य वन्य जीव यांचा तो कर्दनकाळ ठरत आहे.आज नियमांचा पाढा पाट असला तरी निसर्गाच्या सानिध्यात आल्यावर तो सपाट होत असल्याचे दिसते. त्रंबकेश्वर,परिसरात अशी अनेक ठिकाणे आहेत की त्या ठिकाणी पर्यटकांचे पाय हे सुट्टी, किंवा शनिवारी ,रविवारी, थिरकले जातात. सध्या तरी पहिने, अंजनेरी, हर हर किल्ला ,दुगारवाडी,या ठिकाणी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने बंदी घातली आहे.तरी येणाऱ्या पर्यटक यांचा ओघ कमी झालेला नसून ,आलोच, आहोत तर कुठली तरी सफर करूनच जावी या आशेने या पर्यटकांनी सध्या ,अंबोली,घाट, वेळुंजे परिसर , कशप्पी धरण, वाघेरा घाट, या ठिकाणी आता गर्दी उसळू लागली आहे.या मुळे निसर्गाची उधळण जरी खुलवत असली तरी पर्यटकांकडून या ठिकाणी मोट्या प्रमाणात कचरा टाकला जात आहे ही सुध्दा एक निसर्गाला आपणच पावसाळ्यात जखम करत आहोत.या वर्षी ,त्रम्बकेश्वर तालुक्यात अनेक ठिकाणी वणवे, लागले, बहुतेक ठिकाणी अ-वैद्य वृक्ष तोड ,झाली ,ब्रम्हगिरी, सारूळ, भागडी, संतोषा, या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उत्खन झाले.ते रोखण्यासाठी पर्यावरण प्रेमी यांना आज तरी थोडे फार यश आले आहे.परंतु ज्या जैवविविधता, नदी, नाले, गड किल्ले, पर्वत रांगा या ठिकाणी होणारे मानवी उपद्रव यांना रोखणे हे आता हाताबाहेर गेले आहे.त्या साठी आता प्रशासनाने अधिक जागृत होऊन यावर नियंत्रण ठेवणे फार जरुरीचे आहे.नुकतीच ,नाशिकच्या व ग्रामीण भागातील काही पर्यवारण प्रेमी यांनी शिवार फेरी केली.या वेळी त्यांनी कशप्पी, धरणरोहिले, माळेगाव ,गणेशगाव(वा) धुमोडी, व अंबोली घाट या ठिकाणी शिवार फेरी केली.व निसर्गाचा होणारा हॉस व येथील जैव विविधता या साठी बचाव म्हणून काय करता येईल या संबंधी चर्चा व उपाय योजना याची जंगलात चर्चा घडवून आणली.या वेळी रोहिले, वाघेरा,घाट येथील वणव्यात जळालेल्या झाडाची पाहणी केली, तर अंबोली घाटात रस्त्यालगत खूप मोठ्या प्रमाणवर्ती कचरा,रिकाम्या दारूच्या बाटल्या, व नाल्यात टाकलेले निर्माल्य आढळून आले.याला प्रतिबंध करण्यासाठी येथील परिसरातील स्थानिक रहिवाशी व पर्यवारण प्रेमी यांच्यात पुढील उपाय योजना या बाबद चर्चा घडवून आणली .या वेळी, गड कोट किल्ले संवर्धन समितीचे ,राम खुर्दळ, आदिवासी भागात काम करणारे ,देवचंद महाले, पर्यवरणात काम करणारे जितेंद्र भावे, जगबिर शिंग, पक्षी मित्र पोपट महाले, जल परिषद कार्यकर्ते अनिल बोरसे, थोरात साहेब बाळू महाले इत्यादींनी या शिवार फेरीत सहभाग घेतला होता.
“आदिवासी ग्रामीण भाग हा .निसर्ग व सृष्टी सौंदर्य यांनी नटलेला असून .या ठिकाणी बहुतांश पर्यटक हा शहरातून येतो.व मनमुराद आनंद घेत असतो.त्या साठी त्याने जागृत राहणे गरजेचे आहे.जंगलात येऊन दारूच्या पार्ट्या करण्याऐवजी वृक्ष रोपण करा,या जंगलात कचरा फेकू नका, रिकाम्या बाटल्या फेकू नका. तसेच अति गर्दी होणाऱ्या ठिकाणी ,वनविभाग किंवा, पोलीस यांचा पहारा ठेवा.”
देवचंद महाले.(पर्यावरण प्रेमी व आदिवासी संस्कृती ,कला साहित्य )
COMMENTS