Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पुण्याहून रिसोड कडे प्रवाशी घेऊन जाणाऱ्या बसचा अपघात

या घटनेत एक प्रवाशी गंभीर झाला असून १० प्रवाशी किरकोळ जखमी

जालना प्रतिनिधी - पुण्याहून रिसोड कडे प्रवाशी घेऊन जाणाऱ्या बाळाजी ट्रॅव्हल्सच्या बस आणि मालवाहू ट्रकचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. हा अपघ

पुणे-अहमदनगर महामार्गावर भीषण अपघात.
जम्मू-काश्मीरमधील बस अपघातात 39 जणांचा मृत्यू
आठ वर्षीय तनिषला दुचाकीची धडक

जालना प्रतिनिधी – पुण्याहून रिसोड कडे प्रवाशी घेऊन जाणाऱ्या बाळाजी ट्रॅव्हल्सच्या बस आणि मालवाहू ट्रकचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. हा अपघात आज सकाळी ५ च्या सुमारास बदनापूर शहरातील औरंगाबाद -जालना महामार्गावर घडला आहे. ट्रॅव्हल्स बस ट्रकला ओव्हरटेक करताना हा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. बस ट्रकला घासत दुभाजकावर उलटल्याने हा अपघात झाल्याची महिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. या अपघातात एक प्रवाशी गंभीर झाला असून १० प्रवाशी किरकोळ जखमी झाले आहे. जखमींना रुग्णलायत दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे. बदनापूर येथील ग्रामीण रुग्णालयात जखमींवर उपचार सुरु आहे.

COMMENTS