सांगली / प्रतिनिधी : जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागातर्फे जलजीवन मिशनअंतर्गत पाणी योजनांची कामे सुरू आहेत. यातील 51 ठेकेदारांनी निविदा भ
सांगली / प्रतिनिधी : जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागातर्फे जलजीवन मिशनअंतर्गत पाणी योजनांची कामे सुरू आहेत. यातील 51 ठेकेदारांनी निविदा भरल्या आहेत. त्या मंजूर झाल्या आहेत. मात्र, अद्यापही संबंधित ठेकेदारांनी अनामत रक्कम भरलेली नाही. सूचना देऊनही याकडे दुर्लक्ष केल्याने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांनी संबंधितांना नोटीस दिली आहे. सोमवार, दि. 17 पर्यंत कागदपत्रांची पूर्तता करा, अन्यथा कामे रद्द करू, असा इशारा त्यांनी दिला आहे.
सांगली जिल्ह्यात ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने जलजीवन मिशनअंतर्गत अनेक कामे सुरू आहेत. प्रत्येक गावात प्रतिव्यक्ती 55 लिटर पाणी देण्याचे प्रशासनाचे नियोजन सुरू आहे. त्यादृष्टीने नियोजन आराखडे करण्यात आले आहे. मात्र, काही ठेकेदार कमी दराने निविदा भरतात आणि पुन्हा स्पर्धेतून बाहेर पडतात. त्यामुळे नवीन कामे सुरू होण्यात अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डुडी यांनी पात्र ठरलेल्या 51 ठेकेदारांनी वेळेत अनामत रकमेच्या धनादेशासह कागदपत्रे दिलेली नाहीत. त्यामुळे संबंधितांवर कारवाईची तयारी डुडी यांनी सुरू केली आहे. अनामत रकमेच्या धनादेशासह अन्य कागदपत्रे देण्याची अनेकदा सूचना देऊनही त्यांची पूर्तता केलेली नाही. त्यामुळे संबंधित ठेकेदारांना सोमवारपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. मुदतीत कागदपत्रे आली नसल्यास कामे रद्द करण्यात येणार आहेत.
COMMENTS