महाराष्ट्र राज्यात गेल्या चार महिन्यापासून सुुरु असलेल्या राजकीय घडामोडीने काही ठिकाणी मतदारांमध्ये असमाधानाचे वातावरण आहे. तसेच काही ठिकाणी ज्यांनी
महाराष्ट्र राज्यात गेल्या चार महिन्यापासून सुुरु असलेल्या राजकीय घडामोडीने काही ठिकाणी मतदारांमध्ये असमाधानाचे वातावरण आहे. तसेच काही ठिकाणी ज्यांनी कुणी शिवसेनेच्या सत्तेला सुरुंग लावला त्यांच्यावर चिडचिड होत असल्याचे दिसून आले. अर्थात राजकिय डावपेच टाकताना नेत्यांनी एकमेकांना अडचणीत आणण्याच्या दृष्टीने चांगलेच घट्ट जाळे विणल्याने काल निवडणूक आयोगाने तात्पुरत्या स्वरुपात शिवसेनेचे चिन्ह गोठवले. मात्र, या घटनेत पक्षाच्या नवाचिन्ह गोठले मात्र आता कार्यकर्त्यांसह पदाधिकार्यांचे रक्त तापू लागले आहे. याचा भडका कधी उडेल याचा काहीही नेम राहिला नाही. कोण पक्षासाठी तर कोण पक्षामुळे मिळालेल्या छत्रासाठी लढत होते. हे समजण्या इतके मतदार खुळे राहिलेले नाहीत. आगामी निवडणूकामध्ये याचा करिष्मा जाणवेल. कोण खरे आणि कोण खोटे याचा मतदारच सोक्ष मोक्ष लावतील.
शिवसेनेचे चिन्ह निवडणूक आयोगाने तात्पुरते गोठवले. यापूर्वी काँग्रेस पक्षाचेही चिन्ह गोठवण्यात आले होते. तसेच उत्तर भारतातही अशी घटना घडली होती. त्यामुळे आता हे प्रकरण मुंबईमधील एका जागेसाठी जास्त ताणण्यात आल्याचेही समोर आले आहे. दरम्यान, या निवडणूकीत शिवसेनेचा शिंदे गट निवडणूक लढणार नसल्याचेही शिवसेनेच्या ठाकरे गटाने जाहीर केले आहे. तरीही शिंदे गटाने पक्षासह पक्षाच्या चिन्हावर हक्क दाखवून पेचप्रसंग निर्माण केला होता. त्यावर आता तात्पुरता तरी पडदा पडला आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयास सुप्रिम कोर्टात आव्हान दिले जावू शकते. त्यामुळे हा निर्णय आता कोणत्याही निर्णायकतेच्या दिशेने गेलेला नाही हे ही तितकेच खरे आहे. राज्य घटनेने दिलेले अधिकार हे सर्वसामान्यांना जितके लागू होतात तितकेच राजकिय नेत्यांनाही लागू होतात. फरक एवढाच आहे की, सामान्य जनतेची कामे करण्यासाठी नियुक्त केलेले लोकसेवकांची पदे वर्षानोवर्षे रिक्त ठेवली जातात. मात्र, एखादा लोकप्रतिनिधी राजीनामा देतो कींवा मृत होतो. त्यावेळी मात्र, सरकार चालवणारे त्यांच्या सोयीसाठी ते पद पुन्हा तात्काळ भरले जावे यासाठी प्रयत्न करते. हेच काल घडलेल्या घटनेतून समोर येत आहे. शिवसेनेचे अंधेरी पूर्व या मतदार संघाचे आमदार रमेश लटके यांचे अकाली निधन झाले होते. त्यानुसार या जागेसाठी काही दिवसातच पोटनिवडणूक होणार आहे. त्या निमित्ताने चिन्हाचा खटका लवकर पाडण्याची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निवडणूक आयोगाकडे पत्राद्वारे केले होते. दरम्यान, शिवसेनेतून बाहेर पडून वेगळा गट स्थापन करून शिवसेना पक्षासह चिन्हावर दावा करणारे व शिवसेनेचा उध्दव ठाकरे गट यांच्यातील वाद मिटता-मिटेना. त्यामुळे दोन्ही गटाकडून दाखल असलेल्या याचिकेवर काल केंद्रिय निवडणूक आयोगाने घेतलेल्या निर्णयात दोन्ही गटांना पक्षाच्या नावासह चिन्हाचा वापर करण्यास बंदी घालण्यात आली आहे. ही कारवाई जरी तात्पुरत्या स्वरूपाची असली तरीही दोघांनाही आता नव्या चिन्हासह पक्षाच्या नावाचा शोध घ्यावा लागणार आहे. त्यामुळे होवू घातलेल्या अंधेरी पूर्वच्या निवडणूकीतच मतदार यावर आपला निर्णय घेतील. बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना पक्ष स्थापन केल्यापासून मराठी माणसाच्या हितासाठी काम करण्याची घोषणा केली होती. त्यामुळे मराठी माणसाची अस्मिता आता पणाला लागल्याचे दिसून येत आहे. तसेच नुकत्याच झालेल्या दसरा मेळाव्यातील खर्चावरून आता ईडीच्या कार्यालयात तक्रार अर्ज दाखल झाल्याने आता शिंदे गटाच्याही लोकांना सत्तेत असताना ईडीची पिडा त्रास देणार असल्याचे संकेत मिळू लागले आहेत.
COMMENTS