संजीवनी अभियांत्रिकीच्या 60 विद्यार्थ्यांची इन्फोसिसमध्ये निवड

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

संजीवनी अभियांत्रिकीच्या 60 विद्यार्थ्यांची इन्फोसिसमध्ये निवड

कोपरगाव प्रतिनिधी:- संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाच्या प्रयत्नाने कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्ह अंतर्गत इन्फोसिस या सॉफ्टवे

शेकडो युवक कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश
कोपरगावात डॉ. आंबेडकरांची जयंती विविध उपक्रमांनी साजरी
आदिवासी तरुण सुनिल कडाळे बनला कृषिमंडळ अधिकारी

कोपरगाव प्रतिनिधी:- संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाच्या प्रयत्नाने कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्ह अंतर्गत इन्फोसिस या सॉफ्टवेअर क्षेत्रातील आघाडीच्या बहुराष्ट्रीय कंपनीने संजीवनीच्या 60 विद्यार्थ्यांची आकर्षक पगारावर निवड केली असुन संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाने ग्रामिण विद्यार्थ्यांना नोकर्‍या मिळवून देण्यात आघाडी घेतली आहे. अशी माहिती संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.
पत्रकात कोल्हे यांनी पुढे म्हटले आहे की, संजीवनीच्या प्रयत्नातुन विविध नामांकित कंपन्यांमध्ये निवड होत असलेले विद्यार्थी बहुतांशी  ग्रामिण भागातील आहे. मागील दोन आडीच वर्षांच्या कोरोना महामारीच्या काळात सर्वच क्षेत्रातील अर्थकारण कोलमडले होते. यात ग्रामिण भागाला मोठा फटका बसला आहे. अशा परिस्थितीत संजीवनीने अधिक नेटाने काम करून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना नोकर्‍या कशा  देता येईल यावर लक्ष केंद्रीत केले आणि यातुन मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांना नोकर्‍या मिळत आहे. इन्फोसिस या कंपनीने निवड केलेल्या  विद्यार्थ्यांमध्ये 2021-22 च्या अंतिम वर्षातील कॉम्युटर इंजिनिअरींग विभागातील 14, इन्फर्मेशन टेक्नालॉजी विभागातील 6, मेकॅनिकल इंजिनिअरींग विभागातील 13, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरींग विभागातील 4, सिव्हिल इंजिनिअरींग विभागातील 9 व इंलेक्ट्रिकल इंजिनिअरींग विभागातील 14 नवादित अभियंत्यांचा समावेश आहे. इन्फोसिस ही जरी सॉफ्टवेअर क्षेत्रातील कंपनी असली तरी संजीवनी मधील शिक्षणामुळे सर्वच विद्या शाखांमधिल नवोदित अभियंत्यांना नोकरीची संधी मिळाली आहे. संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे अध्यक्ष नितीनदादा कोल्हे, मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे व विश्‍वस्त  सुमित कोल्हे यांनी निवड झालेले विद्यार्थी व त्यांच्या पालकांचे अभिनंदन केले तसेच डायरेक्टर डॉ. ए. जी. ठाकुर, सर्व विभाग प्रमुख व अँड प्लेसमेंट डीपार्टमेंटच्या सर्व टीमचेही अभिनंदन केले.

COMMENTS