कोपरगाव प्रतिनिधी / ज्या परिसरात जलसिंचनाचे योग्य नियोजन केलेले असेल तो परिसर खर्या अर्थाने समृद्ध झालेला असतो. याचे वास्तववादी दर्शन संवसर परिसर
कोपरगाव प्रतिनिधी / ज्या परिसरात जलसिंचनाचे योग्य नियोजन केलेले असेल तो परिसर खर्या अर्थाने समृद्ध झालेला असतो. याचे वास्तववादी दर्शन संवसर परिसरात घडते. संवत्सरला राबविण्यात आलेले उपक्रम केवळ जिल्ह्यालाच नव्हे तर राज्याला देखील मार्गदर्शक ठरेल असे प्रतिपादन जिल्हा उपवनसंरक्षक श्रीमती सुवर्णा माने यांनी केले.
संवत्सर येथील वन विभागाच्या क्षेत्रात माजी जिल्हा परिषद सदस्य राजेश परजणे पाटील यांच्या प्रयत्नातून बांधण्यात आलेल्या साठवण बंधार्यातील पाण्याचे पूजन तसेच प. पू. महंत राजधरबाबा प्राणवायू स्मृतीवनातील परिसरात वृक्षारोपणाचा कार्यक्रम राष्ट्रसंत जनार्दन स्वामी आश्रमाचे प्रमुख महंत रमेशगिरीजी महाराज, जिल्हा उपवनसंरक्षक श्रीमती सुवर्णा माने, गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी यांच्या हस्ते नुकतेच झाले. याप्रसंगी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात श्रीमती माने बोलत होत्या. याप्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य राजेश परजणे पाटील, पंचायत समितीचे बालविकास प्रकल्प अधिकारी पंडितराव वाघिरे, बांधकाम विभागाचे शाखा अभियंता श्री गुंजाळ, सहाय्यक गटविकास अधिकारी बाळासाहेब साबळे, गटशिक्षणाधिकारी श्रीमती शबाना शेख, सेवानिवृत्त उप अभियंता उत्तमराव पवार, सरपंच सुलोचना ढेपले, उपसरपंच विवेक परजणे यांची याप्रसंगी प्रमुख उपस्थिती होती.
प्रारंभी ग्रामस्थांच्यावतीने प. पू. महंत रमेशगिरीजी महाराज व श्रीमती सुवर्णा माने( Suvarna Mane) यांचा सत्कार करण्यात आला. अहमदनगर जिल्ह्यात ठिकठिकाणी वनविभागाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर असून अशा क्षेत्रात छोटे – मोठे साठवण बंधारे, औषधी वनस्पतींचे वृक्षारोपण करून परिसराची समृद्धी वाढविता येते. यासाठी ग्रामस्थांचे प्रयत्न व इच्छाशक्तीची आवश्यकता लागते. जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राजेश परजणे यांनी संवत्सर परिसरात केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना व उपक्रम राबवून जिल्ह्यात गावाचा नावलौकिक वाढवला आहे. मूलभूत गरजा ग्रामस्थांपर्यंत पोहोचविण्याबरोबरच शिक्षण क्षेत्राची देखील या परिसरात चांगली प्रगती दिसून येते असे गौरवोद्गार श्रीमती माने यांनी काढले.
COMMENTS