Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अबब…! दोन महिन्यात पुल खचला

ठेकेदाराचे काम निकृष्ट, दोन कोटी पाण्यात दिघोळ माळवाडी येथील घटना

जामखेड प्रतिनिधी :- केवळ दोनच महिन्यापूर्वी  मुख्यमंत्री सडक योजनेतून जामखेड तालुक्यातील दिघोळ माळवाडी(Dighol Malwadi) रस्त्यावरील काम पूर्ण झाल

कोरोनामुक्त गावांना लाखोंची बक्षिसे आणि योजनाही!
* निघोज कुरुंद पठारवाडी पुन्हा कोरोना हॉटस्पॉट! l पहा LokNews24*
महिलेचा पाठलाग करून गैरवर्तन, गुन्हा दाखल

जामखेड प्रतिनिधी :– केवळ दोनच महिन्यापूर्वी  मुख्यमंत्री सडक योजनेतून जामखेड तालुक्यातील दिघोळ माळवाडी(Dighol Malwadi) रस्त्यावरील काम पूर्ण झालेला पुल अक्षरशः तुटुन पडला. संबंधित ठेकेदाराच्या कामाचा निकृष्टपणा उघडा पडला असून शासनाचे लाखो रुपये मातीत गेलेल्या पुलाचे काम डोंगरे या ठेकेदाराने केले असल्याचे समजते. सार्वजनिक बांधकाम व ठेकेदाराबाबत ग्रामस्थ संताप व्यक्त करत आहेत. 6 ऑक्टोबर रोजी रात्रीत जामखेड तालुक्यात झालेल्या जोरदार पावसामुळे दिघोळ ते माळवाडी दरम्यान वांजरा नदीच्या जवळ आमराई ओढ्यावर बांधलेला अर्धा पुल अक्षरशः कोसळुन पडला आहे. उर्वरित पुलाच्या खालची माती ढासळत असल्याने त्यावरून वहातूक व नागरिकांना जाणे येणे धोक्याचे झाले आहे. नागरिकांनी ठेकेदाराला लाखोली वहात दूसरया बाजूने जाणे येणे चालू केले आहे. दिघोळ ते माळवाडी अशा साडेतीन किमी च्या रस्त्यासह पुलाच्या कामासाठी एक कोटी चौरयान्नव लाख रुपयांचा निधी मंजूर झाला होता. आमराई ओढ्यावरील जुना पुल तोडुन नवा पुल तयार करण्यात होता. सदर पुलाचे काम अवघ्या दोन महिण्यांपुर्वी काम पुर्ण झाले होते. दि 6 रोजी रात्री झालेल्या जोरदार पावसाने ठेकेदाराच्या निकृष्ट कामाचा उत्कृष्ट नमुना दाखवला. पुलाच्या कामाच्या दर्जाची चौकशी होऊन ठेकेदारावर कारवाई करण्याची व दुसरा पुल बांधुन देण्याची मागणी ग्रामस्थ करत आहेत.

COMMENTS