Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

स्वच्छ सर्वेक्षणात मलकापूर शहर पश्‍चिम भारतात 8 व्या स्थानी

कराड / प्रतिनिधी : शहरी व नागरी कार्य मंत्रालय भारत सरकार यांद्वारे स्वच्छ भारत अभियान 2.0 अंतर्गत स्वच्छ सर्वेक्षण 2022 स्पर्धा देशपातळीवर सर्व

लोणंद येथे शिवजयंती दिनी श्रीमंत कोकाटे यांचे व्याख्यान; इतिहास संशोधकाच्या शब्दांची धार पुन्हा गरजणार
राज्य मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार; राज्यमंत्रीही घेणार शपथ
लैंगिक अत्याचार प्रकरणी आरोपिस 10 वर्षाच्या सक्तमजुरीची शिक्षा

कराड / प्रतिनिधी : शहरी व नागरी कार्य मंत्रालय भारत सरकार यांद्वारे स्वच्छ भारत अभियान 2.0 अंतर्गत स्वच्छ सर्वेक्षण 2022 स्पर्धा देशपातळीवर सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राबविणेत आली. दि. 1 ऑक्टोंबर रोजी देशाचे राष्ट्रपती महामहिम द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते या स्पर्धेचा निकाल जाहिर झाला. यामध्ये देशपातळीवर 3901 पश्‍चिम भारतात 823 व राज्यात 289 शहरांनी सहभाग नोंदविला होता. त्यामध्ये मलकापूर नगरपरिषदेस देशपातळीवर 25 वा, पश्‍चिम भारतात व राज्यात 8 वा क्रमांक प्राप्त केला आहे. तसेच कचरा मुक्त शहर 3 स्टार व ओडीएफ ++ मानांकन प्राप्त झाले असल्याची माहिती उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली.
शहराचे सौंदर्यीकरण व स्वच्छेतेत अजून भर पडली जाणार आहे. यामध्ये नागरिकांचा लोकसहभाग असणे आवश्यक आहे. नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष निलमा येडगे, मुख्याधिकारी राहुल मर्ढेकर, बांधकाम सभापती राजेंद्र यादव, नियोजन सभापती पुजा चव्हाण, महिला व बालकल्याण सभापती गितांजली पाटील, उपसभापती अलका जगदाळे, नगरसेविका आनंदी शिंदे, भारती पाटील, कमल कुराडे, शकुंतला शिंगण, स्वाती तुपे, श्रीमती माधुरी पवार, नंदा भोसले, निर्मला काशिद, नुरजहान मुल्ला, नगरसेवक प्रशांत चांदे, किशोर येडगे, नारायण रैनाक, अमर इंगवले, अजित थोरात, भास्कर सोळवंडे, दिनेश रैनाक यांनी सहभाग नोंदवला.
तसेच कार्यालय अधिक्षक राजेश काळे, बाजीराव जाधव, आरोग्य विभाग प्रमुख प्रिया तारळेकर, नगरअभियंता शशिकांत पवार, शहर समन्वयक पुंडलिक ढगे, अमित महाडिक, ज्ञानदेव साळुंखे, आत्माराम मोहिते, सुनंदा शिंदे, प्रियांका धनवडे, शाहीन मनेर, सागर निकम, रमेश बागल, संपत हुलवान, दिलीप साठे, सावकर देवकुळे, अमर तडाखे, हेमंत पलंगे, रुपाली ढापरे तसेच आरोग्य कर्मचारी व सर्व नगरपरिषद कर्मचारी, मलकापूर शहरातील विशेषत: महिला, नागरिक, अंगणवाडी सेविका व मदतनीस, शिक्षकवर्ग व विद्यार्थी वर्ग, ज्येष्ठ नागरिक, युवक वर्गाचा मोलाचा सहभाग लाभलेले व आशा सेविका, मदतनीस, स्वच्छतादुत यांनी अथक परिश्रम घेतले आहे. या यशाने मलकापूर शहराच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा वाढलेमुळे सन्मान प्राप्त झाला आहे.

COMMENTS