Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

विवाहित प्रेयसीसाठी बुरखा घालणार्‍या प्रियकरास चोर समजून बदडले

सातारा / प्रतिनिधी : विवाहित प्रेयसील बुरखा घालून भेटायला गेलेल्या एका युवकास मुले चोरणार्‍या टोळीचा सदस्य समजून नागरिकांनी बदडल्याची घटना सातारा

राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येण्यासाठी हालचाली; सुसंवादासाठी प्रयत्न सुरु असल्याची शरद पवारांची माहिती
कराड येथील 25 घरांना आग; सिलेंडर स्फोटाने शहर हादरले
आता गुन्हेगाराच्या संपत्तीतून मिळणार पीडित व्यक्तीला मोबदला; नव्या विधेयकात खास तरतूद

सातारा / प्रतिनिधी : विवाहित प्रेयसील बुरखा घालून भेटायला गेलेल्या एका युवकास मुले चोरणार्‍या टोळीचा सदस्य समजून नागरिकांनी बदडल्याची घटना सातारा शहरात घडली. दरम्यान, संबंधित युवकाची माहिती नागरिकांनी पोलिसांना दिली. त्यानंतर शाहूपुरी पोलिसांनी युवकाला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केल्यानंतर प्रेमप्रकरणाचा प्रकार उघडकीय आला.
प्रेमात एकमेकांना पाहण्याची किंवा भेटण्याची ओढ कोणाला काय करायला लावेल सांगता येत नाही. सातार्‍यातील एका प्रेमवीराचा असाच आगळावेगळा प्रकार उघडकीस आला आहे. विवाहित प्रियकर आपल्या विवाहित प्रेयसीला भेटण्यासाठी चक्क बुरखा घालून आला. परंतु, ही शक्कल प्रियकराची हाडे मऊ करून गेली. दरम्यान, गेल्या महिनाभरात लहान मुलांना चोरून नेणार्‍या टोळीबाबत सोशल मिडियावर बर्‍याच घटनांची चर्चा सुरु आहे. अशा स्थितीत मुलं चोरणारा व्यक्ती समजून लोकांनी त्याला या युवकाला चांगलाच चोप मार दिला.
या घटनेचे विशेष असे आहे की, प्रेयसी आणि तिचा हा प्रियकर दोघंही विवाहित आहेत. सातार्‍यातील तामजाईनगरमध्ये ही घटना घडली आहे. एक व्यक्ती बुरखा घालून आला होता. तो शाळेचे नाव विचारत होता. यावेळी तिथल्या एका दुकानदाराला संशय आल्याने त्याने त्याला पकडले. यावेळी बुरख्यात स्त्री नसून पुरुष असल्याचे लक्षात आले. त्यानंतर मुलांना पळवायला आला की काय, अशा संशय घेत परिसरातील नागरिकांनी या युवकाला चांगलाच बेदम चोप मार दिला. त्यानंतर त्याला शाहूपुरी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. पोलिसी खाक्या दाखवताच आपण प्रेयसीला भेटायला आल्याचे कबूल केले. प्रेमवीराचे प्रकरण ऐकल्यानंतर पोलिसही चक्रावून गेले.

COMMENTS