Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कुडाळ ग्रामपंचायतींचा निधी जिल्हा परिषद दिव्यांग निधीमध्ये घेऊ नये : विरेंद्र शिंदे

कुडाळ / वार्ताहर : ग्रामपंचायतीकडील स्वनिधीतील पाच टक्के रक्कम ही दिव्यांगाकरिता खर्च केली जाते. मात्र, जिल्ह्यातील दिव्यांगाचे सर्वे सुरू असून हा नि

भाजप आमदार जयकुमार गोरे यांच्या जामीन अर्जावर उद्या सुनावणी होणार
दि. बा. पाटील यांची अखिल भारतीय शिव-मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड
कराड पालिका निवडणूकीच्या पार्श्‍वभूमिवर दबावाचे राजकारण सुरु

कुडाळ / वार्ताहर : ग्रामपंचायतीकडील स्वनिधीतील पाच टक्के रक्कम ही दिव्यांगाकरिता खर्च केली जाते. मात्र, जिल्ह्यातील दिव्यांगाचे सर्वे सुरू असून हा निधी जिल्हा दिव्यांग कल्याण निधीमध्ये जमा करावा. याबाबत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी कळविले आहे. कुडाळ ग्रामपंचायतीकडील दिव्यांग निधी हा जिल्हा परिषद दिव्यांग निधीमध्ये घेऊ नये, अशी मागणी कुडाळचे माजी सरपंच सरपंच व विद्यमान सदस्य विरेंद्र शिंदे यांनी निवेदनाद्वारे केली आहे. मेढा, ता. जावळी येथे गटविकास अधिकारी रमेश काळे यांना त्यांनी याबाबतचे निवेदन दिले. यावेळी जेष्ठ नागरिक संघाचे भाऊराव शेवते, यात्रा कमिटीचे खजिनदार उत्तम देवकर, अजित शिराळकर, गणेश कुंभार व ग्रामस्थ उपस्थित होते.
ग्रामपंचायतीकडील 5 टक्के निधी हा 40% दिव्यांग प्रमाणपत्र असणार्‍यांसाठी देणे बंधनकारक आहे. कुडाळ ग्रामपंचायत अंतर्गत दरवर्षी एकूण 67 दिव्यांगाकरिता हा निधी खर्च केला जातो. कोरोनाच्या काळात आर्थिक संकटात असताना या दिव्यांगाना याचा मोठा फायदा झाला आहे. यातून मिळणार्‍या आर्थिक मदतीतून दिव्यांगाच्या औषधोपचार व त्यांच्याकरीता लागणारे साहित्य, शालेय साहित्य व इतर महत्वाच्या गरजा पूर्ण होण्यास मदत झाली. भारत सरकार व महाराष्ट्र दिव्यांगांना मुख्य प्रवाहात आणणे व स्वावलंबी बनविण्यासाठी प्रयत्नशील आहे. असे असताना प्रशासनाने घेतलेल्या निर्णयाने जिल्ह्यातील दिव्यांगांवर अन्याय होऊन त्यांचे आर्थिक नुकसान होणार आहे. यामुळे प्रशासनाने दिव्यांग निधीबाबत घेतलेल्या निर्णयाचा फेरविचार करावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

COMMENTS