Homeताज्या बातम्याशहरं

दहिवडी पोलिसांचा मार्डी येथे छापा; 9 लाखाचा गांजा जप्त

गोंदवले / वार्ताहर : दहिवडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी स्टाफसह मौजे मार्डी, ता. माण येथे छापा मारुन एकुण 9 लाख 9 हज

अखेर हेळगाव चिंचणी रस्त्याच्या कामाला सुरुवात
सातारा जिल्ह्यातील संस्था मोडीत काढणारे जिल्हा बँकेत नको : खा. श्री. छ. उदयनराजे भोसले
राज्यात आगामी चार दिवस थंडीचे

गोंदवले / वार्ताहर : दहिवडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी स्टाफसह मौजे मार्डी, ता. माण येथे छापा मारुन एकुण 9 लाख 9 हजार रुपयाचा गांजा जप्त केला.
मार्डी, ता. माण येथील काळेवस्तीमधील राहुल तुकाराम गायकवाड हा त्याच्या शेतामध्ये ऊस, मका, घास गवत लावुन त्याचेमध्ये गांजाचे पिक घेऊन विक्री करत असल्याची माहिती दहिवडी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी अक्षय सोनवणे यांना मिळाली होती. त्यांनी आपले सोबत पोलीस उपनिरीक्षक ओ. के. निर्मळ, सहाय्यक फौजदार पी. जी. हांगे, हवालदार एस. एन. केंगले, पोलीस नाईक आर. एस. बनसोडे, पी. बी. कदम, एन. एस. रासकर, टि. जी. चंदनशिवे यांच्यासह होमगार्डचे पथक तयार केले. सरकारी पंच, फोटोग्रॉफर, वजनकाटा धारकांना सोबत नेवून मौजे मार्डी, ता. माण येथील काळेवस्तीमधील राहुल तुकाराम गायकवाड यांच्या शेतात छापा मारुन गांजाची झाडे व विक्रीसाठी सुकविलेला गांजाचा मुद्देमाल जप्त केला. या मालाची सुमारे 9 लाख 9 हजार रुपये किमत होईल. याप्रकरणी दहिवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई करण्यासाठी पोलिसांनी वेषांतर करुन संशयित आरोपीच्या शेतात केली. संशयिताने पोलिसांची दिशाभुल करण्याच्या उद्देशाने शेतात वेगवेगळ्या पिकांमध्ये गांजाच्या झाडांची लागवड केली होती. या कारवाईमुळे दहिवडी परिसरातील अवैध धंदे करणार्‍या लोकांवर चाप बसणार आहे.

COMMENTS