जिव्हाळाच्या दांडिया नाईटमध्ये रंगला दांडिया व गरबा नृत्य

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जिव्हाळाच्या दांडिया नाईटमध्ये रंगला दांडिया व गरबा नृत्य

अहमदनगर (प्रतिनिधी)- शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त शहरातील जिव्हाळा ग्रुप आयोजित व महावीर ग्रुप प्रायोजित दांडिया नाईटमध्ये युवक-युवती दांडियाच्या ताल

संगमनेरमध्ये गोवंश कत्तलखान्यावर छापा
गुळवे हे माणुसकीचे असल्यामुळेच सर्वाधिक उसाचे गाळप
घरकुल आवास योजनेअंतर्गत ८० घरकुलांना मंजूरी

अहमदनगर (प्रतिनिधी)- शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त शहरातील जिव्हाळा ग्रुप आयोजित व महावीर ग्रुप प्रायोजित दांडिया नाईटमध्ये युवक-युवती दांडियाच्या तालावर थिरकली. पारंपारिक वेशभुषेतील युवती व महिला मोठ्या संख्येने यामध्ये सहभागी झाल्या होत्या.
टिळकरोड येथील नंदनवन लॉन येथे दांडिया नाईटचे उद्घाटन नगरसेविका शितलताई जगताप यांच्या हस्ते झाले. यावेळी उपमहापौर गणेश भोसले, उद्योजक राजेश भंडारी, नगरसेविका मीनाताई चोपडा, संजय चोपडा, नगरसेवक प्रकाश भागानगरे, विपुल शेटीया, जिव्हाळा ग्रुपच्या अध्यक्षा अल्पना कासवा, विणा जगताप, सविता काळे, सीमा शेटीया, सुवर्णा डागा, अर्चना बाफना, अर्चना सोलंकी आदींसह महिला, युवक-युवती मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
कोरोनाच्या दोन वर्षानंतर यावर्षी नवरात्र मोठ्या उत्साहात साजरा होत असताना, दांडिया नृत्याच्या कार्यक्रमात युवक-युवतींचा उत्साह संचारला होता. नॉन स्टॉप म्युझिक लाईट, डीजेने रंगत आलेल्या दांडिया नाईटमध्ये पारंपारिक वेशभुषेत महिला व युवक-युवतींच्या ग्रुपने दांडिया नृत्याचे बहारदार सादरीकरण केले. यामध्ये संपूर्ण जिल्ह्यातील दांडियाचे ग्रुप सहभागी झाले होते. महिलांनी महिलांसाठी राबविलेल्या या उपक्रमात महिलांचा प्रतिसाद लक्षणीय होता. या दांडिया नृत्य स्पर्धेत बेस्ट सोलो डान्सर दिप्ती मुंदडा, आकाश धोका, बेस्ट कपल डान्स मोनिका मेहता व ज्योती शहा, शितल गांधी व पलक गांधी, बेस्ट किड्स डान्सर विश्‍वजा आमले, विदित छल्लाणी, बेस्ट ग्रुप डान्स रंगरसिया,  उत्तेजनार्थ युनिक ग्रुप, बेस्ट ड्रेसअप साक्षी बरमेचा यांनी बक्षिसे पटकाविली. तर सर्वांसाठी फूड काउंटर्सची सोय करण्यात आली होती. दहा भाग्यवान विजेत्यांना सोडत द्वारे बक्षिसे देण्यात आली. या कार्यक्रमासाठी लक्ष्मी फॅशन्स, चंदुकाका सराफ, कृपाली ब्युटी पार्लर, भारतियम मल्टिस्टेट, बजरंग काशीनाथ गुरव ज्वेलर्स, गजानन हॉस्पिटल, सरस्वती हॉस्पिटल, पोळ क्लासेस, नाऊ अ‍ॅण्ड फॉरेवर फोटोग्रॉफी यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिव्हाळाच्या ग्रुपच्या सर्व महिला सदस्यांनी परिश्रम घेतले.

COMMENTS