बाळासाहेबांच्या विचारांचे सोने लुटण्याचा अधिकार फक्त आम्हालाच

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बाळासाहेबांच्या विचारांचे सोने लुटण्याचा अधिकार फक्त आम्हालाच

मंत्री शंभूराजे देसाई यांनी सेनेला काढला चिमटा

पंढरपूर प्रतिनिधी - राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार(Sharad Pawar) यांचा ऐकल्यामुळे शिवसेनेची आज ही अवस्था झाली आहे. त्यांच्याच ऐकण्यामुळे काँग

विकास कामांना निधी मंजूर करण्याचा माझा प्रयत्न : ना. शंभूराज देसाई
कोणीतरी जाणीवपूर्वक वावड्या उठवत आहे
शासन आपल्या दारी अभियानाचा सातारा पॅटर्न राबवा : पालकमंत्री शंभूराज देसाई

पंढरपूर प्रतिनिधी – राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार(Sharad Pawar) यांचा ऐकल्यामुळे शिवसेनेची आज ही अवस्था झाली आहे. त्यांच्याच ऐकण्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबतची अनैसर्गिक युती उद्धव साहेबांनी केली. त्यामुळे दसरा मेळावा किंवा इतर सर्व बाबतीत पवार साहेब यांना उद्धव साहेब यांची अधिक चिंता असल्याचा टोमणा राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई(Shambhuraj Desai) यांनी लगावला. राज्य उत्पादन शुल्क मंत्री देसाई हे पंढरपुर येथे शिवसेनेतील शिंदे गटाच्या हिंदू गर्व गर्जना मेळाव्यास आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.प्रसंगी, दसरा मेळाव्याला बाळासाहेबांच्या विचारांचे सोने लुटण्याचा अधिकार फक्त आम्हालाच आहे. असे सांगत राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराजे देसाई यांनी सेनेलाही चिमटा काढला.

COMMENTS