टाटा हॅरियर ही कार देखील इलेक्ट्रिक व्हेरिएंटमध्ये लाँच करू शकते.

Homeताज्या बातम्याटेक्नोलॉजी

टाटा हॅरियर ही कार देखील इलेक्ट्रिक व्हेरिएंटमध्ये लाँच करू शकते.

कारच्या लाँचिंगबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

 भारतात आता इलेक्ट्रिक वाहनांसाठीची मागणी वाढतेय. इलेक्ट्रिक दुचांकींच्या बाजारातून विक्रीचे चांगले आकडे सातत्याने समोर येत आहेत. इलेक्ट्रिक कार्सच्य

मार्चअखेर कोल्हापूर शहराला मिळणार पाईपलाईनद्वारे स्वयंपाकाचा गॅस
देशातील सर्वात मोठा ‘ऑटो शो’ आजपासून सुरू
इस्त्रोने एकाचवेळी प्रक्षेपित केले 36 उपग्रह

 भारतात आता इलेक्ट्रिक वाहनांसाठीची मागणी वाढतेय. इलेक्ट्रिक दुचांकींच्या बाजारातून विक्रीचे चांगले आकडे सातत्याने समोर येत आहेत. इलेक्ट्रिक कार्सच्या विक्रीत देखील वाढ पाहायला मिळाली आहे. टाटा मोटर्स कंपनी दबदबा राखून आहे. कंपनी सध्या भारतात सर्वाधिक ३ इलेक्ट्रिक कार्स विकत आहे. कंपनीने २०२७ पर्यंत १० नवीन मॉडेल्स लाँच करण्याची योजना बनवली आहे. कंपनीला आपला इलेक्ट्रिक व्हेइकल पोर्टफोलिओ वाढवायचा आहे. याबद्दल कंपनीने आधीच घोषणा केली आहे. त्यामुळे कंपनी आगामी काळात टाटा टियागो ईव्ही, टाटा अल्ट्रॉझ ईव्ही, टाटा पंच ईव्ही आणि सिएरा बेस्ड इलेक्ट्रिक कार लाँच करणार आहे. भारतात सध्या ज्या इलेक्ट्रिक कार उपलब्ध आहेत, यांच्या किंमती १२ लाख रुपयांच्या पुढे आहेत. कंपनी आगामी काळात भारतात १० लाख रुपयांच्या आत इलेक्ट्रिक कार लाँच करू शकते. तसेच कंपनी टाटा हॅरियर ही कार देखील इलेक्ट्रिक व्हेरिएंटमध्ये लाँच करू शकते. ही कार तिच्या टेस्टिंग फेजमध्ये आहे. मात्र या कारच्या लाँचिंगबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

COMMENTS