परीक्षेत पात्र, निवड मात्र दुसर्‍यांची ; आरोग्य विभाग भरती; निवड न झालेले उमेदवार संतप्त

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

परीक्षेत पात्र, निवड मात्र दुसर्‍यांची ; आरोग्य विभाग भरती; निवड न झालेले उमेदवार संतप्त

राज्य सरकारच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने 28 फेब्रुवारी रोजी सिनियर क्लार्क, लॅब टेक्निशियन, नर्सेस यासारख्या विविध पदांसाठी ऑफलाईन पद्धतीने परीक्षा घेण्यात आली होती.

गोदावरीच्या दूध उत्पादकांना मिळणार दहा लाखाचे विमा कवच
शासकीय ग्रंथालयाच्या अनुदानात होणार 60 टक्के वाढ
खाद्य तेलावरचे आयातशुल्क कमी करण्यास नकार

पुणे/प्रतिनिधी: राज्य सरकारच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने 28 फेब्रुवारी रोजी सिनियर क्लार्क, लॅब टेक्निशियन, नर्सेस यासारख्या विविध पदांसाठी ऑफलाईन पद्धतीने परीक्षा घेण्यात आली होती. त्याचा निकाल 19 एप्रिलला जाहीर करण्यात आला तसेच पात्र उमेदवारांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी आज पुण्यात बोलावले होते; मात्र प्रत्यक्षाच पात्र उमेदवारांऐवजी वेगळ्याच उमेदवारांची नावे प्रसिद्ध करण्यात आली आहेत. त्यामुळे यादीत नाव न आलेल्या पात्र उमेदवारांमध्ये संतापाची तीव्र लाट उसळली आहे. 

राज्य सरकारच्या आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या विविध पदांच्या जवळपास पाचशेंहून अधिक जागांसाठी भरतीची जाहिरात काढण्यात आली होती. त्यासाठी राज्याच्या कानाकोपर्‍यातून उमेदवारांनी 28 फेब्रुवारी रोजी परीक्षा दिली होती. त्याचा निकाल 19 एप्रिलला जाहीर झाला. त्यात उत्तीर्ण व पात्र उमेदवारांची नावे वेबसाईटवर जाहीर करण्यात आली होती. तसेच त्यांना कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी पुण्यातील आरोग्य विभागाच्या कार्यालयात बोलवण्यात आले होते. त्यामुळे परिसरात उमेदवारांची एकच गर्दी जमा झाली होती; मात्र आज ज्या पात्र मंडळींना बोलावण्यात आले होते ते तिथे पोहचल्यावर  भलतीच नावे प्रसिद्ध झाली. त्या उमेदवारांमध्ये यवतमाळ, नांदेड, अमरावती, औरंगाबाद अशा विविध ठिकाणाहून आलेल्यांची संख्या मोठी होती. आरोग्य विभागाच्या सावळ्या गोंधळावर संतप्त उमेदवारांनी तीव्र रोष व्यक्त केला. यासंबंधी आरोग्य विभागाच्या उपसंचालकांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही. एक उमेदवार महिला म्हणाली, की सिनियर क्लार्क पदासाठी एनटी विभागातून मी परीक्षा दिली होती. त्यात मला 148 गुण मिळाले आहेच; मात्र आता इथे आल्यावर समजले की विभागाने ती जागाच घेतलेली नाही. जर तुम्हाला 50 टक्के जागांचीच भरती करायची होती, तर त्याचवेळी हॉल तिकीट वगैरे देणे गरजेचे नव्हते. ऐनवेळी जागाच रद्द केल्यामुळे सर्वच मेहनत वाया गेली. त्यात मानसिक त्रास पण सहन करावा लागत आहे. गणेश क्षीरसागर म्हणाला, की अनुसुचित जाती प्रवर्गातून आरोग्य विभागाच्या निघालेल्या पदासाठी परीक्षा दिली होती; मात्र जाहीर करण्यात आलेल्या अंतिम यादीत सर्वाधिक गुण असूनदेखील मला डावलले गेले आहे. माझ्या जागी 66 गुण असलेल्या व्यक्तीचे नाव नमूद करण्यात आले आहे. या निवडीवर माझा तीव्र आक्षेप आहे. याबाबत श्रीकांत देशपांडे म्हणाले, की माझ्या पत्नीने लॅब टेक्निशियन पदासाठी परीक्षा दिली होती. त्यात तिला 112 गुण मिळाले आहे. तिला कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी आज आरोग्य विभागाच्या कार्यालयात बोलावले होते; मात्र तिथे गेल्यावर तिचे नावच नसल्याचे निदर्शनास आले. तसेच तिथे चौकशी केल्यावर संबंधित अधिकार्‍यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली.

COMMENTS