Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

ज्येष्ठ विधीज्ञ कॉ. धैर्यशील पाटील यांचे सातारा येथे निधन

सातारा / प्रतिनिधी : ज्येष्ठ विधीज्ञ कॉ. धैर्यशील पाटील ऊर्फ डी. व्ही. पाटील (वय 79) यांचे आज (बुधवार) सकाळी पावणे अकराच्या सुमारास अल्प आजाराने

महावितरणच्या अथक प्रयत्नांना यश; कृषिपंपांना 8 तास सुरळीत वीजपुरवठा
पावसाळ्यात वीजयंत्रणेपासून सतर्क राहण्याचे महावितरणचे आवाहन
बाल लैंगिक अत्याचारप्रकरणी एकास 20 वर्षाची सक्त मजूरी

सातारा / प्रतिनिधी : ज्येष्ठ विधीज्ञ कॉ. धैर्यशील पाटील ऊर्फ डी. व्ही. पाटील (वय 79) यांचे आज (बुधवार) सकाळी पावणे अकराच्या सुमारास अल्प आजाराने सातार्‍यातील राहत्या घरी निधन झाले. त्यांच्या पश्‍चात पत्नी अ‍ॅड. दिपा पाटील, मुलगा नगरसेवक निशांत पाटील, अ‍ॅड. सिध्दार्थ पाटील, मुलगी नताशा शालगर असा परिवार आहे. ते ’दादा’ या नावाने परिचित होते.
आज सायंकाळी पाचच्या सुमारास त्यांच्यावर संगममाहुली येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. अ‍ॅड. धैर्यशील पाटील हे नेर्ले (ता. वाळवा, जि. सांगली) गावचे असून 14 जुलै 1943 मध्ये त्यांचा जन्म झाला. त्यांचे वडील सातार्‍याचे आ. व्ही. एन. पाटील होते. अ‍ॅड. पाटील हे ’दादा’ नावाने परिचित होते. त्यांनी सलग 52 वर्षे वकिली करून विविध नामवंत खटल्यात यश मिळवत महाराष्ट्रभर नाव कमवले होते. फौजदारीचे ते निष्णात वकिल होते.
शरद लेवे खून खटल्यात खा. उदयनराजे यांची बाजू संभाळली
बार कौन्सिल ऑफ इंडियाचे ते अध्यक्ष होते. तसेच महाराष्ट्र, गोवा बार असोसिएशनचे ते अध्यक्ष होते. गोवा बार असोसिएशनचा त्यांना जीवन गौरव पुरस्कार मिळाला होता. धैर्यशील पाटील यांनी कामगार, कष्टकरी समाजासाठी शेवटपर्यंत कार्यरत राहिले. डाव्या विचारसरणीचा त्यांच्यावर प्रचंड प्रभाव होता. सातार्‍यातील शरद लेवे खून खटल्यात त्यांनी खा. उदयनराजे भोसले यांची बाजू संभाळली होती. तसेच महाराष्ट्र केसरी संजय पाटील खून खटल्यात अ‍ॅड. उदयसिंह पाटील-उंडाळकर यांची बाजू त्यांनी संभाळली होती.

COMMENTS