खारे कर्जुने येथील जुनी विहिर खचली

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

खारे कर्जुने येथील जुनी विहिर खचली

या विहिरीची ग्रामस्थांनी केली नूतनीकरणाची मागणी

अहमदनगर प्रतिनिधी : अहमदनगर जिल्हात पावसाने  जोरदार  हजेरी लावली आहे .तळे, नद्या, नाले, विहिरी तुडुंब भरल्या आहेत. मात्र  नगर तालुक्यातील खारे कर्जुन

जाामखेड शहर अस्वच्छतेच्या विळख्यात
भातकुडगाव फाटा परिसरातील रेडी नदीवरून गाडी गेली वाहून
फायनान्स कंपनीच्या तगाद्याला कंटाळून तरुण शेतकर्‍याची आत्महत्या

अहमदनगर प्रतिनिधी : अहमदनगर जिल्हात पावसाने  जोरदार  हजेरी लावली आहे .तळे, नद्या, नाले, विहिरी तुडुंब भरल्या आहेत. मात्र  नगर तालुक्यातील खारे कर्जुने ग्रामपंचायत  हद्दीतील एक जुनी विहीर अचानक खचली आहे . आहे. या विहिरीचा अनेक वर्षापासून गावकरी वापर करत होते.  विहीर अचानक खचल्यामुळे त्या विहिरीजवळील रहिवासी असणाऱ्या वस्तीला व ढवळे परिवाराला धोका निर्माण झाला आहे. अनेक गावकरी व शाळकरी मुले या ठिकाणाहून ये – जा करत असतात व लहान मुले याच विहीरीच्या परिसरात खेळत असतात त्या मुळे या ठिकाणी मोठी दुर्घटना होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
हि विहीर जवळजवळ 55 वर्ष जुनी आहे. त्यामुळे अचानक एखादी अविपरीत घटना घडून मोठी हानी होऊ शकते. त्यामुळे ग्रामस्थ या विहिरीचे नूतनीकरणाची मागणी प्रशासनाकडे करीत आहेत.

COMMENTS