जागतिक आरोग्य संघटना आणि मानवी हीत!

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जागतिक आरोग्य संघटना आणि मानवी हीत!

  जागतिक आरोग्य संघटना ही आरोग्याच्या क्षेत्रात अतिशय गंभीर मानली जाणारी संस्था आहे. परंतु, कोरोना काळात अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष डोनाल

निवडणूका संपताच केंद्रीय मंत्री सरंजामी दानवे यांचा गुंडांकरवी ओबीसी कुटुंबावर सशस्त्र हल्ला!
हा सांस्कृतिक गुन्हाच ! 
प्रतिगामी उदयनराजे आणि पुरोगामी फडणवीस !

  जागतिक आरोग्य संघटना ही आरोग्याच्या क्षेत्रात अतिशय गंभीर मानली जाणारी संस्था आहे. परंतु, कोरोना काळात अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या जागतिक संस्थेवर अनेक आरोप करित त्यांचा निधीच बंद केला होता. अर्थात, त्यावेळी अवघ्या जगाने त्यांच्यावर संशय घेतला होता. या संस्थेवर तेव्हा पासून चीन धार्जिणे असण्याचा आणि भांडवलदारांच्या आरोग्य अथवा मानवी जीवनाशी संबंधित असलेल्या उत्पादनाच्या खपासाठी मदत करित असल्याचा आरोप केला जात आहे. तरीही, एकंदरीत मानवी आरोग्य आणि जीवन याविषयी या जागतिक संस्थेकडून केले जाणारे प्रयत्न थांबत नाहीत. आता त्यांनी रस्ते अपघात विषय घेऊन मानवी जीवन सुरक्षित करण्याच्या दृष्टीने काही अभ्यास आणि उपाययोजना सुचविल्या आहेत. त्याविषयी यात जाणून घेण्याचा प्रयत्न करूया.जागतिक आरोग्य संघटनेने हेल्मेट वापर आणि पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेबद्दल धोरणकर्त्यांसाठी दोन मार्गदर्शक तत्त्वे आणली आहेत; ज्यामुळे रस्त्यावरील वाहतूक अपघातात होणाऱ्या मृत्यू आणि जखमींच्या जागतिक संकटाला आळा घालण्यात मदत होईल.इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या तज्ञांनी एकत्रितपणे लिहिलेल्या, मार्गदर्शक तत्वात दिलेल्या निर्देशानुसार रस्त्यावर चालणाऱ्या दुचाकी आणि तीन चाकी वाहनांच्या स्वारांसाठी हेल्मेट वापरणे आणि पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक असल्याचे म्हटले आहे. नवीन पुरावे आणि केस स्टडी यांचा समावेश आहे. जागतिक आरोग्य संघटने च्या उच्च अधिकार्‍यांच्या म्हणण्यानुसार, रस्त्यावरील वाहतूक अपघातांमुळे दरवर्षी १३ दशलक्ष लोकांचा मृत्यू होतो.  दर मिनिटाला दोनपेक्षा जास्त मृत्यू होतात  आणि १० पैकी नऊ मृत्यू कमी आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांमध्ये होतात. जागतिक स्तरावर, रस्त्यावरील वाहतूक अपघातात हे ५ ते २९ वर्षे वयोगटातील मुले आणि तरुण लोकांच्या मृत्यूचे प्रमुख कारण आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. २०३० पर्यंत अपघातामुळे होणारे मृत्यू निम्मे करण्यासाठी आवश्यक असलेली सुरक्षित गतिशीलता प्रणाली तयार करण्यात धोरणकर्त्यांना मदत होते आहे. ही नवीन पुस्तिका महत्त्वाची साधने आहेत,” जागतिक आरोग्य संघटनेमधील सुरक्षा आणि गतिशीलता विभागाचे प्रमुख डॉ. निहान ट्रॅन म्हणाले. खराब पायाभूत सुविधांमुळे, पादचारी, विशेषत: विकसनशील देशांमध्ये, अपघात होतात. मोटारसायकली, स्कूटर, सायकली आणि ई-बाईक वेगाने वाढताहेत आणि त्यांचा वापरही  झपाट्याने वाढत आहे, तरीही दर्जेदार हेल्मेटचा वापर मागे पडतो, याकडे रस्ता सुरक्षा तज्ञाने लक्ष वेधले. जागतिक आरोग्य संघटनेकडे नोंदवलेल्या अपघातातील मृत्यूंपैकी जवळपास ३० टक्के अपघातात दुचाकी आणि तीन चाकी वाहनांचा समावेश आहे. डब्ल्यूएचओ दक्षिण पूर्व आशियाई प्रदेशातील सर्व रस्ते वाहतूकांमध्ये एकूण मृत्यूंपैकी ४३  टक्के मृत्यू या यामुळे घडतात.. पूर्ण चेहरा झाकणारे हेल्मेट ज्यावर योग्य पट्ट्या बसवल्या जातात, त्यामुळे प्राणघातक जखम ६४ टक्क्यांपर्यंत आणि मेंदूच्या दुखापती ७४ टक्क्यांपर्यंत कमी होतात. आयआयटी दिल्लीच्या तज्ञांच्या मते, जागतिक स्तरावर, पादचारी हे सर्वात असुरक्षित रस्ता वापरकर्ते आहेत. २०१३ आणि २०१६ दरम्यान पादचाऱ्यांच्या मृत्यूचे प्रमाण इतर सर्व रस्ते अपघात मृत्यूच्या जवळपास दुप्पट वाढले. रस्त्यांवरील वातावरण सुधारणे, कायदे मजबूत करणे आणि अंमलबजावणी करणे, ज्यामध्ये रस्ते वापरकर्त्यांना शिक्षित करणे आणि त्यांचे वर्तन बदलणे यासह पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेत लक्षणीय सुधारणा होऊ शकते. रस्त्यांवरील रहदारीच्या दुखापती आणि अनावधानाने झालेल्या दुखापती कमी करण्यासाठी आंतरराष्ट्रीय मंच, विशेषत: कमी आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांमध्ये हे प्रयत्न केले जातील. 

COMMENTS