केंद्रीय मंत्री शहांच्या दौर्‍यात घुसखोरी करणार्‍यास अटक

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

केंद्रीय मंत्री शहांच्या दौर्‍यात घुसखोरी करणार्‍यास अटक

खासदाराचा तोतया सचिव बनून वावरत होता आरोपी

मुंबई प्रतिनिधी : केंद्रीय गृहमंत्री अमित शाहां(Amit Shah) च्या मुंबई दौर्‍यादरम्यान एक इसम त्यांच्या अवतीभवती होता. एका खासदाराचा स्वीय सचिव असल

अमित शाहांचा ताफा जाण्यासाठी भररस्त्यात रुग्णवाहिकेला अडवलं
राज्यांसाठी आपत्ती निवारण निर्माण प्रकल्पांना मंजुरी
पंतप्रधान मोदींसह शहांना जीवे मारण्याची धमकी

मुंबई प्रतिनिधी : केंद्रीय गृहमंत्री अमित शाहां(Amit Shah) च्या मुंबई दौर्‍यादरम्यान एक इसम त्यांच्या अवतीभवती होता. एका खासदाराचा स्वीय सचिव असल्याचे सांगून हा व्यक्ती गृहमंत्र्यांच्या भोवती काही तास वावरत होता. यासंदर्भात खुलासा होताच पोलिसांना सदर आरोपीला अटक केली. हेमंत पवार(Hemant Pawar) असे या आरोपीचे नाव असून त्याला 5 दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे 4 आणि 5 ऑगस्ट रोजी मुंबई दौर्‍यावर होते. या दरम्यान त्यांनी मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) यांच्या शासकीय निवासस्थानी भेट घेतली होती. त्यानंतर त्यांनी लालबागच्या राजा(King of Lalbagh) चे आणि वांद्रे येथील आशिष शेलार यांच्या गणेशोत्सव मंडळाती गणरायाचे दर्शन घेतले होते. यावेळी मुंबई पोलीस आणि केंद्रीय यंत्रणांचेही शाह यांच्या सुरक्षितेची खबरदारी घेतली होती. मात्र, या दरम्यान एक व्यक्ती शाह यांच्या भोवती वावरत होती. आपण आंध्र प्रदेशातील खासदाराचे स्वीय सचिव असल्याचे त्याने सांगितले होते. मात्र, मंत्रालयातील एका अधिकार्‍याला या व्यक्तीवर संशय आल्याने त्यांनी मुंबई पोलिसांना याची माहिती दिली. मुंबई पोलिसांनी या व्यक्तिला ताब्यात घेत त्याची चौकशी केली. आरोपीचे नाव हेमंत पवार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. हेमंत पवार हा धुळे जिल्ह्यातील रहिवासी आहे. आरोपी पवार याला कोर्टात हजर करण्यात आले. कोर्टाने त्याला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
शाह यांच्या मुंबई दौर्‍यात मोठा कडेकोट बंदोबस्त असताना दुसरीकडे संशयास्पद व्यक्तीचा वावर कसा काय राहिला, असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे. मुंबई पोलिसांच्या अधिकार्‍यांनी ही सुरक्षेत चूक नसल्याचे म्हटले आहे. मुंबई पोलिसांची ही सतर्कता होती. त्यामुळे त्याला तात्काळ ताब्यात घेण्यात आल्याचे अधिकार्‍यांनी म्हटले. या आरोपीची चौकशी सुरू असल्याचे सांगितले. सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी आरोपी हेमंत पवार हा केंद्रीय गृह खात्याचा सुरक्षा अधिकारी असल्याचे भासवत होता. गृह मंत्रालय/ मिनिस्ट्री ऑफ होम अफेर्स असे नामनिर्देष असलेली निळया रंगाची आयकार्ड सोबत असणारी रिबीन लावून शासकीय अधिकारी असल्याची बतावणी त्याने केली होती. शाह यांच्याभोवती वावरणारा हेमंत पवार हा लोकांची फसवणूक करत होता का, याचाही तपास सुरू आहे. अमित शाह किंवा इतर नेत्यांसोबत मोठी ओळख असल्याचे सांगून तो फसवणूक करत होता का, त्याने आतापर्यंत कितीजणांना गंडा घातला, याचाही तपास सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.

COMMENTS