कोल्हापूरला काळीमा फासणारी घटना

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कोल्हापूरला काळीमा फासणारी घटना

बालविवाह करून मुलीला केले गरोदर

कोल्हापूर प्रतिनिधी  / कोल्हापूर जिल्ह्यातील दऱ्याचे वडगाव येथे एक धक्कादाय घटना समोर आली आहे. अवघ्या 14 वर्षांच्या मुलीशी लग्न करत गरोदर केल्याची घ

काय वाढीव धुतलंय पोरीने या पोरांना…एकच नंबर ! | LOK News 24
14 उपप्रकल्प उभारणीसाठी 21 कोटींचे अनुदान
महावितरणकडून 15 लाख नवीन वीजमीटरचा पुरवठा आदेश

कोल्हापूर प्रतिनिधी  / कोल्हापूर जिल्ह्यातील दऱ्याचे वडगाव येथे एक धक्कादाय घटना समोर आली आहे. अवघ्या 14 वर्षांच्या मुलीशी लग्न करत गरोदर केल्याची घटना समोर आली आहे. दरम्यान तिचे अवघ्या साडेबाराव्या वर्षात लग्न झाल्याचेही उघड झाले आहे. या घटनेने कोल्हापूर जिल्ह्यात शाहू महाराजांनी घालून दिलेल्या शिकवणींना गालबोट लागत असल्याचे दिसून येत आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रात तपासणी वेळी डॉक्टरांना शंका आल्याने त्यांनी अधिक तपासणी केली. यावरून बालविवाहाचा प्रकार उघड झाला आहे. या घटनेबाबत पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. अल्पवयीन मुलीचा नवरा, आई, वडिलांसह पाच जणांवर गुन्हे दाखल झाले आहेत.

COMMENTS