बांधकामच्या भिंतींना भ्रष्टाचाराचे प्लास्टर ; अशोकराव! घरभेद्यांना वेसण घाला !

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बांधकामच्या भिंतींना भ्रष्टाचाराचे प्लास्टर ; अशोकराव! घरभेद्यांना वेसण घाला !

महाराष्ट्राच्या सार्वजनिक बांधकामाला लागलेली भ्रष्टाचाराची उधई प्रत्येक सरकारची डोकेदुःखी ठरत आहे.

एकलव्य संघटनेच्या विभागीय संपर्क कार्यालयाचे ब्राम्हणगावात उद्घाटन
अधिकार्‍यांच्या बदल्या मागे घेण्याची नामुष्की…
अल्पबचत योजनांच्या व्याजदरावरून वाद का?

मुंबई/विशेष प्रतिनिधी : महाराष्ट्राच्या सार्वजनिक बांधकामाला लागलेली भ्रष्टाचाराची उधई प्रत्येक सरकारची डोकेदुःखी ठरत आहे. या उधईवर कुठलाही सार्वजनिक बांधकाम मंत्री कायमस्वरूपी पेस्ट कंट्रोलचा उपचार करू शकला नाही. विशेष म्हणजे सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांच्या होम डिव्हीजनमधूनच या उधईचे किडे राज्यभरात इतरत्र पसरतात हा आजवरचा अनुभव आहे.

विजयसिंह मोहीते पाटील सार्वजनिक बांधकाम मंत्री असतांना पश्‍चिम महाराष्ट्र या भ्रष्टाचारात आघाडीवर होता. छगन भुजबळ यांच्या कार्यकाळात या उधईचे केंद्रस्थान मुंबई आणि उत्तर महाराष्ट्रात विकसित झाले होते, आणि अशोक चव्हाण सार्वजनिक बांधकाम विभागाचा कार्यभार सांभाळत असतांना या भ्रष्टाचाराच्या उधईने अशोकरावांच्या मराठवाडा विदर्भाच्या सीमेवर आश्रय घेतला आहे.

सार्वजनिक बांधकाम मंञी अशोक चव्हाण यांचे घर असलेल्या नांदेडमधूनच या उधईने भ्रष्टाचाराला खतपाणी घातले असून मंत्री म्हणून अशोक चव्हाण यांच्या कार्यक्षमतेलाच आव्हान दिले आहे. नांदेड परिमंडळाचे अधिक्षक अभियंता अविनाश धोंडगे यांच्या असंख्य भ्रष्ट कारनाम्यांची कुंडली लोकमंथनच्या हाती आली असून या कुंडलीतून खळबळजनक गौप्यस्फोट होणार आहेत. प्रथमदर्शनी अधीक्षक अभियंता धोंडगे यांनी मंत्र्यांना अंधारात ठेवल्याचे दिसत असले तरी एकूणच कार्यशैलीवरून अशोक चव्हण या भ्रष्ट घटनाक्रमाबाबत अनभिज्ञ असतील अशी शक्यता फारच धुसर दिसते. यासंदर्भात सविस्तर वृत्तमालिका उद्यापासून.

COMMENTS