इंदौर प्रतिनिधी/ इंदौर च्या परदेसी पुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका खासगी कंपनीत काम करणाऱ्या सात कर्मचाऱ्यांनी विष प्राशन करून आत्महत्येचा प्

इंदौर प्रतिनिधी/ इंदौर च्या परदेसी पुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका खासगी कंपनीत काम करणाऱ्या सात कर्मचाऱ्यांनी विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. कर्मचाऱ्यांनी एकाच वेळी आत्महत्या करण्याच्या उद्देशाने विषारी द्रव्य प्राशन केले. कंपनीने नुकतेच सात कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले होते, त्यामुळे त्यांनी हे पाऊल उचलल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या सर्व कर्मचाऱ्यांना इंदूरच्या एमवाय हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून तेथे उपचार सुरू आहेत. घटनेपासून कंपनीचे मालक रवी बाफना आणि पुनीत अजमेरा बेपत्ता आहेत. सध्या परदेशी पुरा पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
COMMENTS