६ सप्टेंबरला लाँचिंग

Homeताज्या बातम्याटेक्नोलॉजी

६ सप्टेंबरला लाँचिंग

त्याआधीच १० लाख लोकांकडून 'या' स्मार्टफोनची बुकिंग

अमेरिकेतील Huawei विरोधातील बंदी घातल्यानंतर कंपनीच्या स्मार्टफोनच्या विक्रीत मोठी घसरण पाहायला मिळत होती. परंतु, आता असे वाटत आहे की, ब्रँड स्मार्टफ

Nokia G310 लॉन्च! कमी किमतीत दमदार फीचर
सोमवारी जनार्दन स्वामी हॉस्पिटलमध्ये सर्वरोग निदान शिबिराचे आयोजन
प्रा. सोफियाँ मुल्ला यांना पीएचडी पदवी प्रदान

अमेरिकेतील Huawei विरोधातील बंदी घातल्यानंतर कंपनीच्या स्मार्टफोनच्या विक्रीत मोठी घसरण पाहायला मिळत होती. परंतु, आता असे वाटत आहे की, ब्रँड स्मार्टफोन मार्केटमध्ये पुन्हा एकदा जोरदार पुनरागमन करीत आहे. लोकांच्या मनावर राज्य करणार आहे. कंपनीच्या Mate 50 series स्मार्टफोन्सला जबरदस्त रिस्पॉन्स मिळत आहे. Huawei Mate 50 सीरीजच्या स्मार्टफोन्सला चीन मध्ये ६ सप्टेंबर २०२२ रोजी ४ व्हेरियंट्स मध्ये लाँच केले जाणार आहे. परंतु, लाँचिंग आधीच ब्रँडने चीनमध्ये आपल्या अधिकृत वेबसाइटवरून Mate 50 लाइनअपसाठी बुकिंग करणे सुरू केले होते. यात आश्चर्यकारक बाब म्हणजे या फोनला आतापर्यंत १० लाखांहून जास्त लोकांनी बुक केले आहे. याचा थेट अर्थ म्हणजे १० लाख लोक या फोनला खरेदी करू पाहत आहेत. म्हणजेच कंपनीकडे अजूनही घरगुती बाजारात लॉयल ग्राहक आहेत. याच कारणामुळे Huawei ला क्वॉलकॉमचे लेटेस्ट स्नॅपड्रॅगन 8+ Gen 1 SoCs चा वापर करण्यासाठी फोर्स करण्यात आले होते. ४जी केवळ स्नॅपड्रॅगन ८ प्लस झेन १ प्रोसेसर हुवावेच्या फ्लॅगशीप मेट ५० सीरीजला पॉवर देईल.

COMMENTS