कोपरगाव शहर प्रतिनिधी : कोपरगाव शहर पोलीस स्टेशन हद्यीतील गणेश मंडळना गणेशउत्सव शांततेने पार पाडणेकामी कोपरगाव शहर पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांनी
कोपरगाव शहर प्रतिनिधी : कोपरगाव शहर पोलीस स्टेशन हद्यीतील गणेश मंडळना गणेशउत्सव शांततेने पार पाडणेकामी कोपरगाव शहर पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांनी कोपरगाव शहर पोलीस स्टेशन येथे शांतता कमीटीची व गणेश मंडळाची बैठक घेवुन गणेशउत्सव शांततेत पार पाडणे बाबत सर्वाना आवाहन करत शुभेच्छा दिल्या आहे.
सविस्तर वृत्त असे की, बुधवार 31 ऑगस्ट पासून गणरायाचे आगमन होत असून त्या पार्श्वभूमीवर कोपरगाव शहर पोलिसाच्या वतीने सोमवार दि 29 ऑगस्ट रोजी कोपरगाव शहरात येणार गणपती उत्सव शांततेत संपन्न व्हावा या करिता शहर पोलिस निरीक्षक वासुदेव देसले यांनी शांतता समीती सदस्य, श्रीगणेश मंडळ अध्यक्ष, सदस्य, गावातील प्रतिष्ठीत नागरिक, डि जे. चालक मालक, व पोलीस पाटील यांची कोपरगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी शांताराम गोसावी, महावितरण चे सहाय्यक अभियंता अतुल खंडारे, नायब तहसिलदार पी. डी. पवार यांचे उपस्थितीत बैठक घेतली. सदर बैठकीमध्ये गणेश मंडळांना गणेश उत्सव साजरा करणे बाबत शुभेच्छा देत लोकांना त्रास होणार नाही याबाबत विशेष काळजी घेणे बाबत सुचना दिल्या तसेच पर्यावरण पूरक गणेश मुर्तीचा वापर करणे, पर्यावरण पुर्वक सजावट, समाज प्रबोधन या विषयावर विचारावर देखावे, स्वांतत्र्याच्या चळवळी संदर्भातील देखावे, रक्तदान शिबीर, वैद्यकिय सेवा शिबीर, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यासाठी शैक्षणिक व आरोग्य विषयक कार्य, पारंपारिक संस्कृतीक कार्यक्रम, पारंपारिक खेळाच्या स्पर्धा असे कार्यक्रम आयोजीत करणे बाबत तसेच ध्वनी प्रदुषण होणार नाही याची काळजी घेवुन शासकिय नियमांचे पालन करुन गणेशउत्सव साजरा करणे बाबत सुचना देवुन मार्गदर्शन केले. तसेच उत्कृष्ट सार्वजनिक गणेश मंडळाना प्रथम, व्दितीय, तृतीय व दोन उत्तेजनार्थ असे पाच बक्षीसे कोपरगाव शहर पोलीस स्टेशन व नगरपालिका कोपरगाव यांचेकडुन संयुक्तीक देण्यात येणार असले बाबत घोषीत केले आहे. सदरची शांतता कमीटी व गणेश मंडळाची बैठक प्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य राजेश परजणे, फादर प्रमोद बोधक, व्यापारी नारायण अग्रवाल, के जे एस कॉलेजचे प्रा. संतोष पगारे, अस्लम शेख, बाळासाहेब रुईकर, अनिल गायकवाड, संतोष गंगवाल, भरत मोरे, विजय आढाव, फ्रेंडी जोसेफ फर्नांडीस, बापु काकडे, यांचे सह 60 ते 70 गणेश मंडळाचे अध्यक्ष सदस्य, डी जे चालक मालक शांतता समीतीचे सदस्य तसेच महिला दक्षता समीतीचे सदस्या विमल खांबेकर, जोत्स्ना पगारे, तसनीम आयुब पठान, अडव्होकेट पी. व्ही पाटनी, स्वाती मुळे, डॉ. अर्चना मुरूमकर यांच्या सह पोलीस पाटील, पोलीस अधिकारी व सर्व अंमलदार उपस्थित होते.
COMMENTS