केजरीवाल सत्तेच्या नशेत धुंद ! : अण्णा हजारे

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

केजरीवाल सत्तेच्या नशेत धुंद ! : अण्णा हजारे

अहमदनगर/प्रतिनिधी : जनतेला आश्‍वासन देणे, आणि सत्तेत आल्यानंतर त्याचा विसर पडणे, यातून तुमच्या आचरणावर किती परिणाम झाला हे स्पष्ट होत आहे. तुम्ही सध्

पोलिसांनी केले तब्बल सव्वाचार लाखाचे मोबाईल जप्त
श्री स्वामी समर्थ महाराज चरित्र | Shri Swami Samarth Maharaj | LokNews24 |
भिंगार शहराची ओळख असणारी ऐतिहासिक वेस पुन्हा बांधण्याची मागणी

अहमदनगर/प्रतिनिधी : जनतेला आश्‍वासन देणे, आणि सत्तेत आल्यानंतर त्याचा विसर पडणे, यातून तुमच्या आचरणावर किती परिणाम झाला हे स्पष्ट होत आहे. तुम्ही सध्या सत्तेच्या नशेत धुंद आहात, जनआंदोलनातून उदयास आलेल्या पक्षाला अशा प्रकारचे वागणे शोभत नाही, अशी घणाघाती ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आम आदमी पार्टी म्हणजेच आपच्या मद्य धोरणांवर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या विरोधात केली आहे.
अण्णा हजारे यांनी मुख्यमंत्री केजरीवाल यांना पत्र लिहिले असून, त्यांनी या पत्रात आपवर सडकून टीका केली आहे. मद्य धोरणात कथित घोटाळा झाल्याचे आरोप दिल्ली सरकारवर करण्यात आले आहेत. अण्णा या पत्रात केजरीवालांना उद्देशून म्हणतात, अण्णा हजारेंनी पत्रात लिहिलं की, तुम्ही ‘स्वराज’ नावाच्या पुस्तकात अनेक आदर्श बाबींचा उल्लेख केला होता. त्यामुळे तुमच्याकडून आम्हाला खूप आशा होत्या. पण राजकारणात गेल्यानंतर आणि मुख्यमंत्री झाल्यानंतर तुम्ही आदर्श विचारसरणीला विसरला आहात. जशी दारूची नशा असते, तशीच सत्तेची नशा असते. तुम्ही सत्तेच्या नशेत बुडून गेला आहात, असे दिसतय. संबंधित धोरणामुळे भ्रष्टाचाराला खतपाणी मिळू शकते. राजकारणात गेल्यापासून तुम्हाला आदर्श विचारसरणीचा विसर पडला आहे, म्हणूनच तुमच्या सरकारने दिल्लीत नवीन मद्य धोरण आणलं आहे. यातून दारू विक्री आणि मद्यपानाला प्रोत्साहन मिळू शकते. रस्त्यावर दारूची दुकाने सुरू केली जाऊ शकतात. त्यामुळे भ्रष्टाचाराला चालना मिळेल. हे जनतेच्या हिताचे नाही, अशी टीका अण्णा हजारेंनी केली आहे. दिल्ली सरकारकडूनही अशा प्रकारचं धोरण अपेक्षित नव्हतं. पण आम आदमी पार्टीच्या दिल्ली सरकारने नवीन मद्य धोरण आणलं आहे. इतर राजकीय पक्षांप्रमाणेच तुम्हीही पैशांसाठी सत्ता आणि सत्तेसाठी पैसा या दुष्टचक्रात अडकल्याचे दिसत आहे. एका मोठ्या आंदोलनातून उदयाला आलेल्या राजकीय पक्षाला हे शोभत नाही, अशी टीका अण्णा हजारेंनी पत्राद्वारे केली आहे.

कथनी आणि करणीत विसंगती
अण्णा हजारे म्हणाले, सरकार कोणत्याही पक्षाचे असो, सरकारला जनहिताचे काम करण्यास भाग पाडण्यासाठी समविचारी लोकांचा दबावगट असणे गरजेचे होते. तसे झाले असते तर देशात परिस्थिती वेगळी असती आणि गरिबांना फायदा झाला असता. पण दुर्दैवाने तसे झाले नाही. त्यानंतर तुम्ही, मनीष सुसोदिया आणि अन्य सहकार्‍यांनी मिळून पक्ष स्थापन केला. ऐतिहासिक चळवळ उद्ध्वस्त करून स्थापन झालेला पक्षही इतर पक्षांच्या वाटेवर जाऊ लागला. अण्णा म्हणाले, भ्रष्टाचारमुक्त भारतासाठी ऐतिहासिक आणि लोकनियुक्त आंदोलन झाले. त्यात लाखो लोक आले. त्यावेळी तुम्ही लोकायुक्तांची गरज असल्याबद्दल मंचावरून मोठमोठी भाषणे दिलीत. आदर्श राजकारण आणि व्यवस्थेचे विचार मांडले. पण दिल्लीचे मुख्यमंत्री झाल्यानंतर तुम्ही लोकपाल आणि लोकायुक्त कायदा विसरलात. तुमच्या सरकारने महिलांवर परिणाम करणारे, लोकांचे जीवन उद्ध्वस्त करणारे दारू धोरण केले. यावरून तुमच्या बोलण्यात आणि वागण्यात तफावत असल्याचे दिसून येते.

COMMENTS