पाणी भरणाऱ्या महिलेला वानराने विहिरीत दिले ढकलून.

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पाणी भरणाऱ्या महिलेला वानराने विहिरीत दिले ढकलून.

नांदेड जिल्ह्यातील नांदगाव मधील घटना

नांदेड  प्रतिनिधी- नांदेड मध्ये धुमाकूळ घालणाऱ्या वानरांच्या मस्तीमुळे एका महिलेवर भयंकर प्रसंग ओढावला होता. विहिरीत पाणी भरत असताना एका महिलेला वान

भर सभेत ग्रामसेवकाला बेदम मारहाण
उद्धव ठाकरेंचे पक्षप्रमुख पदच धोक्यात
महाराणी छत्रपती ताराबाईंचा इतिहास येणार रुपेरी पडद्यावर

नांदेड  प्रतिनिधी– नांदेड मध्ये धुमाकूळ घालणाऱ्या वानरांच्या मस्तीमुळे एका महिलेवर भयंकर प्रसंग ओढावला होता. विहिरीत पाणी भरत असताना एका महिलेला वानराने विहिरीत ढकलून दिलं. नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील नांदगावमध्ये ही घटना घडली. विहिरीत पडलेल्या या महिलेचा जीव अगदी थोडक्यात वाचलाय. विहिरीच्या शेजारी असलेल्या नागरिकांनी प्रसंगावधान राखलं आणि विहिरीत पडलेल्या या महिेलला बाहेर काढलं. त्यामुळे थोडक्यात मोठा अनर्थ टळलाय. या महिलेला किरकोळ दुखापत झाली आहे. या घटनेला गावातील लोकांनी वनविभागाला जबाबदार धरलंय.

COMMENTS