Homeताज्या बातम्यालाईफस्टाईल

एकाच जागी बसून काम केल्यामुळे पायांवर येतेय सूज

घरगुती उपायांनी मिळेल आराम

धकाधकीच्या जीवनात व्यायाम आणि संतुलित आहार याकडे लक्ष देणं शक्य होत नाही. परिणामी त्याचे आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहेत. सध्या अनेकांना कामांचा

भाजप, केंद्र सरकारचा इडी, सीबीआय, एनसीबीच्या चौकश्या लाऊन सरकार पाडण्याचा प्रयत्न (Video)
प्रा. सचिन गायवळ यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा
दोन चिमुकल्यांसह आईचा मृतदेह आढळला विहिरीत | LokNews24

धकाधकीच्या जीवनात व्यायाम आणि संतुलित आहार याकडे लक्ष देणं शक्य होत नाही. परिणामी त्याचे आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहेत. सध्या अनेकांना कामांचा प्रचंड ताण असतो. त्यामुळे ऑफिसमध्ये अनेक तास एकाच ठिकाणी बसून राहावं लागतं आणि पायांवर सूज येण्याची समस्या निर्माण होते. घरगुती उपाय करून त्यावर मात करता येणं शक्य आहे.

तुम्ही जिथे काम करता तिथल्या कामाच्या पद्धतीचा अवलंब केल्याशिवाय पर्याय नसतो. एकाच जागी अनेक तास बसून काम करण्याची जणू कर्मचाऱ्यांना सवयच झालेली असते. यामुळे अनेकांचे पाय सुजतात. सुरुवातीला ही बाब किरकोळ वाटत असली तरी भविष्यात याचे गंभीर परिणाम भोगावे लागू शकतात. या समस्येवर अनेक घरगुती उपाय आहेत. त्यांचा अवलंब केल्यास नक्कीच फायदा होऊ शकतो. एकाच जागी बसून पायावर सूज आली तर सोपा आणि साधा उपाय म्हणजे बर्फाचे तुकडे (Ice Pack) घेऊन जिथे सूज आहे त्या जागी हलक्या हाताने मसाज करावा. काही वेळानंतर आराम मिळत असल्याचा अनुभव तुम्ही घेऊ शकता. याद्वारे पायावरची सूज कमी होऊ शकते.

हळदीची पेस्ट– मार लागल्यानंतर रक्तस्राव थांबवण्यासाठी बऱ्याचदा जखम झालेल्या ठिकाणी हळद लावली जाते. हळद अनेक बाबतीत गुणकारी आहे. त्याप्रमाणे पाय सुजले असल्यासही हळद उपयोगी ठरू शकते. पायावरची सूज कमी करण्यासाठी एक चमचा हळद घेऊन त्यात एक चमचा खोबरेल तेल घालून त्याची पेस्ट तयार करावी. सूज असलेल्या जागी ती पेस्ट लावावी आणि ती पेस्ट पूर्णपणे वाळल्यानंतर कोमट पाण्याने ते धुऊन टाकावं. यामुळे तुम्हाला आराम मिळू शकेल.

मसाज– एकाच जागी बसून पायांवर सूज येणे ही समस्यांना अनेकांना भेडसावते. यावर मसाज उपयुक्त ठरतो. व्हर्जिन कोकोनट ऑइल थोडं गरम करावं. या तेलात काही लसूण पाकळ्या घालाव्यात. तेलात लसूण टाकून तयार झालेलं तेल घेऊन 5 मिनिटांपर्यंत पायांवर मसाज करावा. काही दिवसांतच त्याचे सकारात्मक परिणाम दिसून येतील.

COMMENTS