शंखी गोगलगायीमुळे नुकसानीची भरपाई देणार, समिती स्थापणार : मंत्री अब्दुल सत्तार

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शंखी गोगलगायीमुळे नुकसानीची भरपाई देणार, समिती स्थापणार : मंत्री अब्दुल सत्तार

मुंबई : शंखी गोगलगायी मुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत देऊ. शेतीच्या नुकसानीबाबत विचार करण्यासाठी समिती स्थापन करण्यात येईल, असे मदत आणि पुनर्वसन

कांदा उत्पादकांना 550 कोटींची नुकसान भरपाई
कृषीमंत्री सत्तारांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा
कृषीमंत्री सत्तारांचा पाय आणखी खोलात

मुंबई : शंखी गोगलगायी मुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत देऊ. शेतीच्या नुकसानीबाबत विचार करण्यासाठी समिती स्थापन करण्यात येईल, असे मदत आणि पुनर्वसन मंत्री अब्दुल सत्तार यांनी आज विधानसभेत सांगितले. महाराष्ट्र विधानसभा नियम 105 अन्वये उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेस उत्तर देताना त्यांनी ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, लातूर जिल्ह्यातील अनेक तालुक्यांत शंखी गोगलगायीमुळे खरीप पिकांचे नुकसान झाले आहे. लातूर आणि इतर काही जिल्ह्यांमध्येही शंखी गोगलगायमुळे शेतीचे नुकसान झाले आहे. हे नुकसान नेमके किती झाले आहे. नुकसान भरपाई किती द्यावी लागेल यासाठी समिती स्थापन केली जाईल. समितीच्या अहवालानंतर शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यात येईल. याबाबतच्या चर्चेत सदस्य सर्वश्री धनंजय मुंडे, अभिमन्यू पवार, नमिता मुंदडा आदी सहभागी झाले.

COMMENTS