मानधन वेळेत मिळण्यासाठी यंत्रणा विकसित करणार – उपमुख्यमंत्री फडणवीस

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मानधन वेळेत मिळण्यासाठी यंत्रणा विकसित करणार – उपमुख्यमंत्री फडणवीस

मुंबई, दि. 22 : संजय गांधी निराधार योजनेतून दिले जाणारे मानधन वेळेत दिले जाईल यासाठी यंत्रणा विकसित केली जाईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्

बाबासाहेब पुरंदरे अनंतात विलीन ; शासकीय इतमामात झाले अंत्यसंस्कार
मनोरमा खेडकर यांना 14 दिवसांची कोठडी
बारामतीला धडका मारू नका डिपॉझिट जप्त होईल.

मुंबई, दि. 22 : संजय गांधी निराधार योजनेतून दिले जाणारे मानधन वेळेत दिले जाईल यासाठी यंत्रणा विकसित केली जाईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिली.
महाराष्ट्र विधानसभा नियम 105 अन्वये उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेस उत्तर देताना त्यांनी ही माहिती दिली.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, संजय गांधी निराधार योजनेतून दिव्यांग, निराधार, विधवा, परित्यक्ता यांना मानधन देण्यात येते. पण कधी काही तांत्रिक अडचणीमुळे मानधन वेळेत देण्यात अडचणी येतात. पण या अडचणींवर मार्ग काढून मानधन वेळेत दिले जाण्यासाठी यंत्रणा विकसित केली जाईल.
सामाजिक न्यायमंत्री संजय राठोड यांनी या योजनेतून दिले जाणारे मानधन वाढवून देण्याबाबत शासन सकारात्मक असून ज्येष्ठ नागरिकांची वयोमर्यादा 65 वरुन 60 वर्षे करण्यासाठी तातडीने बैठक घेऊ, असे सांगितले. या लक्षवेधी सूचनेवरील चर्चेत सदस्य सुनील कांबळे, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे आदी सहभागी झाले होते.

COMMENTS