भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने अनेक भारतीय आणि पाकिस्तानी यूट्यूब न्यूज चॅनेलवर कठोर कारवाई केली आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने भ
भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने अनेक भारतीय आणि पाकिस्तानी यूट्यूब न्यूज चॅनेलवर कठोर कारवाई केली आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने भारताच्या राष्ट्रीय सुरक्षा, परराष्ट्र संबंध आणि सार्वजनिक सुव्यवस्थेशी संबंधित दुष्प्रचार प्रसार करणारे 8 यूट्यूब चॅनेल ब्लॉक केले आहेत. या चॅनेलमध्ये 7 भारतीय आणि 1 पाकिस्तान आधारित यूट्यूब चॅनेलचा समावेश आहे. ब्लॉक करण्यात आलेले हे यूट्यूब चॅनेल 114 दशलक्षाहून अधिक वेळा पाहिले गेले आहेत. या चॅनेलचे 85 लाख 73 हजार सदस्य आहेत. या सर्व चॅनल्सवर IT नियम 2021 अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. या चॅनलच्या माध्यमातून भारताविरोधी खोट्या बातम्या पसरवल्या जात होत्या, असं केंद्र सरकारकडून सांगण्यात आलं आहे. ब्लॉक करण्यात आलेल्या यूट्यूब चॅनेल मध्ये हे डेमोक्रेसी टीव्ही, यू अँड व्ही टीव्ही, एएम राजवी, ग्लोरियस पवन मिथिलांचल, सीटॉप 5 टीएच, सरकार अपडेट्स आणि सब कुछ देखो. याशिवाय न्यूज की दुनिया नावाचं पाकिस्तानमधील यूट्यूब चॅनलही ब्लॉक करण्यात आलं आहे.
COMMENTS