दावणीला बांधलेल्या बैलासमोर नागाने काढला फणा

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

दावणीला बांधलेल्या बैलासमोर नागाने काढला फणा

20 मिनिटे फणा काढून नागाचा बैलाला घाबरवण्याचा प्रयत्न

जालना प्रतिनिधी  - सध्या राज्यभरात मुसळधार पाऊस सुरू आहे. पावसामुळे नदी-नाल्यांना पूर आला असून अनेक ठिकाणी जलमय परिस्थिती निर्माण झाली आहे. बिळात पा

पोटच्या मुलाचा जन्मदात्यांवर कुर्‍हाडीने हल्ला
दिल्लीच्या पराभवाने आरसीबी प्लेऑफमध्ये ; कर्णधार रिषभ पंत ठरला खलनायक !
सतीश वाघ हत्या प्रकरणाचा उलगडा ; पत्नी मोहिनी वाघ हिनेच हत्येची सुपारी दिल्याची कबूली

जालना प्रतिनिधी  – सध्या राज्यभरात मुसळधार पाऊस सुरू आहे. पावसामुळे नदी-नाल्यांना पूर आला असून अनेक ठिकाणी जलमय परिस्थिती निर्माण झाली आहे. बिळात पाणी गेल्याने सापांचा मुक्त संचार देखील वाढला आहे. अशातच जालना(Jalna) जिल्ह्यातून एक बातमी समोर आली आहे. शेतकऱ्याने दावणीला बांधलेल्या एका बैलासमोर सलग 20 मिनिटे फणा काढून नागाने बैलाला घाबरवण्याचा प्रयत्न केला. मात्र दावणीला बांधलेला बैल जराही या नागाला न घाबरता मोठ्या तोऱ्यात टाईट उभा राहिला. जालना जिल्ह्यातील अंबड(Ambad) तालुक्यातील लोणार भायगाव(Lonar Bhaigaon) येथे ही घटना घडलीय. काही ग्रामस्थांनी मोबाईलमध्ये ही घटना कैद केली. शेतकरी सोनाजी जाधव(Sonaji Jadhav) यांच्या शेतात हि घटना घडली आहे. अखेरीस नागाने माघार घेत तेथून धूम ठोकली आणि उभ्या असलेल्या ग्रामस्थांनी बैलाचे कौतुक करत सुटकेचा निश्वास टाकला.

COMMENTS