अमूल दुधात प्रतिलिटर दोन रुपयांची वाढ

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अमूल दुधात प्रतिलिटर दोन रुपयांची वाढ

मुंबई/प्रतिनिधी : गेल्या काही दिवसांपासून, महागाईचा विस्फोट होत असतांनाच, देशातील अग्रगण्य दूध उत्पादक कंपनी असलेल्या अमूलनं दुधाच्या किमती वाढवल्या

पुण्यात पुन्हा कोयता गँगचा धुडगूस
तुमचे आजचे राशीचक्र शुक्रवार, २९ एप्रिल २०२२ l पहा LokNews24
सचोटीने, ध्येयाने ‘प्रकाश’ पेरणाऱ्या राजेंद्र पवारांचे जीवनचरित्र सर्वांसाठी प्रेरणादायी – डॉ. सबनीस

मुंबई/प्रतिनिधी : गेल्या काही दिवसांपासून, महागाईचा विस्फोट होत असतांनाच, देशातील अग्रगण्य दूध उत्पादक कंपनी असलेल्या अमूलनं दुधाच्या किमती वाढवल्या आहेत. अमूलच्या दुधात 2 रुपयांची वाढ करण्यात आली असून, ही दरवाढ आज बुधवारपासून लागू होणार आहे.
अमूल दूध कंपनीकडून दुधाचे दर प्रतिलिटर 2 रुपयांनी वाढवण्यात आले आहेत. कंपनीकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, आता अर्धा लिटर अमूल गोल्डची नवीन किंमत 31 रुपये तर अर्धा लिटर अमूल ताजाची किंमत 25 रुपये झाली आहे. याशिवाय अमूल शक्ती दुधाच्या प्रत्येक अर्धा लिटरच्या पाकिटासाठी 28 रुपये मोजावे लागणार आहेत. गेल्याच महिन्यात अमूल, गोवर्धन सोनाई यांसह सर्वच दूध कंपन्यांनी दूधाच्या दरात दोन रुपयांची वाढ केलेली होती. परंतू महिनाभरात पुन्हा वाढ झाल्याने सर्वसामान्यांना पुन्हा महागाईचा सामना करावा लागणार आहे. सर्वसामान्यांना गेल्या काही महिन्यांपासून महागाईचा सामना करावा लागत आहे. पेट्रोल, डिझेल सह किराणा सामानातील वस्तूंच्या किमती अतिशय झपाट्याने वाढत असल्याने सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले जात आहे. त्यातच आता पुन्हा दूधाच्या किमतीत वाढ झाल्याने महिन्याच्या बजेटचे नियोजन करायचे कसे असा प्रश्‍न उपस्थित होऊ लागला आहे.

COMMENTS