‘हॅलो’ला विरोध करणाऱ्यांच मतपरिवर्तन करू…

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

‘हॅलो’ला विरोध करणाऱ्यांच मतपरिवर्तन करू…

भारत देशाचा गौरव होत असेल तर त्याला विरोध का ?

नागपूर प्रतिनिधी- हॅलोच्या ऐवजी वंदे मातरम् म्हणण्याच्या सूचना मंत्री सुधीर मुनगंटीवार(Sudhir Mungantiwar) यांनी दिल्यानंतर त्यांच्या या सुचनेवर प्र

आव्हाडांना अटक करणार्‍या उपायुक्तांची बदली
जितेंद्र आव्हाड यांची जामीन मंजूर झाल्यानंतर मुंब्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा जल्लोष
अनंत करमुसे प्रकरणात आव्हाडांचा पीए तडीपार

नागपूर प्रतिनिधी- हॅलोच्या ऐवजी वंदे मातरम् म्हणण्याच्या सूचना मंत्री सुधीर मुनगंटीवार(Sudhir Mungantiwar) यांनी दिल्यानंतर त्यांच्या या सुचनेवर प्रचंड गदारोळ माजला आहे. शिवसेना, राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी लोकशाही आणि व्यक्तीस्वातंत्र्याचा मुद्दा पुढे करुन आम्ही काय बोलायचे हे पण तुम्हीच ठरवणार का असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. त्यावर बोलताना सुधीर मुनगंटीवार यांनी बोलताना सांगितले की, वेद मंत्राहून आम्हा वंदे वंदे मातरम् आहे त्यामुळे भारत देशाचा गौरव होत असेल तर त्याला विरोध का आणि कशासाठी. हॅलो हा शब्द अकराव्या शतकापासून आला असून तो शब्द इंग्रजांनी प्रचलित केला आहे , त्यानंतर आपल्या भारताचा गौरव ज्या शब्दातून होतो त्या शब्दाचा उल्लेख करायला कोणतेही राजकारण नाही, किंवा कोणत्याही पक्षाचा त्यामध्ये उदो उदो नाही, आपल्या देशाचाच गौरव त्यातून होणार आहे त्यामुळे आम्ही विरोधकांना मनावयाचा प्रयत्न करु असंही मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.

COMMENTS