वाशिम- स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्यभरात आयोजन करण्यात आलंय. स्वातंत्र्याचा हा अमृत महोत्सव राष्ट्रीय उत्सव झाला असून देशभर राष्ट्

वाशिम- स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्यभरात आयोजन करण्यात आलंय. स्वातंत्र्याचा हा अमृत महोत्सव राष्ट्रीय उत्सव झाला असून देशभर राष्ट्रभक्ती, देशभक्तीचा उत्साह शिगेला पोचलायं. वाशिम जिल्ह्यातील बहुतांश ग्रामीण भागात शाळा, महाविद्यालये आणि स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. हर घर तिरंगा अभियान यशस्वी करण्यासाठी वाशिम जिल्ह्यातील आदर्श ग्राम वनोजा येथे साळुंकाबाई राऊत महाविद्यालय, श्री शिवाजी कानिटकर महाविद्यालय जिल्हा परिषद प्राथमिक मराठी केंद्रीय शाळा आणि अंगणवाडी केंद्राच्या वतीने प्रभात फेरी, व तिरंगा सन्मान रॅलीचे आयोजन करण्यात आले. रॅलीमध्ये विद्यार्थ्यांनी क्रांतिवीरांच्या वेशभूषा केल्या.
COMMENTS