Homeताज्या बातम्यादेश

गुजरात मधील आणंद जिल्ह्यात भीषण अपघात

काँग्रेस आमदार पूनम परमार यांच्या जावयाने मद्यधुंद अवस्थेत अनेकांना उडविले अपघातात 6 जणांचा मृत्यू

 गुजरात प्रतिनिधी-  गुजरात(Gujarat) मधील आणंद( Ānanda) जिल्ह्यात एक भीषण अपघात झाला आहे. काँग्रेस आमदार पूनम परमार (Congress MLA Poonam Parmar) य

गॅस लिक होऊन घरगुती सिलेंडरचा स्फोट.
अल्पवयीन मुलाने गाडी चालवत वाहनांना उडवले
रावणाचं दहन करताना झाला मोठा अपघात

 गुजरात प्रतिनिधी-  गुजरात(Gujarat) मधील आणंद( Ānanda) जिल्ह्यात एक भीषण अपघात झाला आहे. काँग्रेस आमदार पूनम परमार (Congress MLA Poonam Parmar) यांच्या जावयाने मद्यधुंद अवस्थेत गाडीने अनेकांना उडवले आहे. त्यामध्ये सहा जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तसेच काहीजण गंभीर जखमी झाले असल्याची माहिती मिळाली आहे. हा अपघात आनंद जिल्ह्यातील सोजित्रा(sojitra) तालुक्यातील डाळी गावाजवळ झाला. अपघातामध्ये रक्षाबंधनासाठी गेलेल्या दोन सख्ख्या बहिणी आणि आईचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी जाहीर केली आहे. चालकावरती रुग्णालयात उपचार सुरु असून तब्येत बरी झाल्यानंतर पोलिस चालकाला ताब्यात घेणार आहे.

COMMENTS