मराठवाडी धरणाच्या मालदनमध्ये बंधार्‍याला गळती

Homeमहाराष्ट्रसातारा

मराठवाडी धरणाच्या मालदनमध्ये बंधार्‍याला गळती

पाटण तालुक्यातील ढेबेवाडी विभागातील मराठवाडी धरणाच्या मालदनमध्ये बंधार्‍याला गळती लागल्याने मालदन, गुढेसह परिसरातील शेतकरी पाणी टंचाई मुळे चिंतेत आहे.

माजी मंत्री, आमदार अमित देशमुख यांच्याकडून नुतन पदाधिका-यांचे अभिनंदन
मीरा भाईंदरचे आयुक्त ईडीच्या रडारवर
आफताबच्या नार्को टेस्टला मंजुरी

पाणी टंचाईमुळे ढेबेवाडी परिसरातील शेतकरी चिंतेत

ढेबेवाडी / प्रतिनिधी : पाटण तालुक्यातील ढेबेवाडी विभागातील मराठवाडी धरणाच्या मालदनमध्ये बंधार्‍याला गळती लागल्याने मालदन, गुढेसह परिसरातील शेतकरी पाणी टंचाई मुळे चिंतेत आहे. पाण्याअभावी पिके वाळत चालल्याने तातडीने बंधार्‍याची गळती काढून त्यात मराठवाडी व साखरी धरणातून पाणी सोडण्याचे नियोजन करण्याची मागणी शेतकर्‍यांनी केली आहे.

पाटण तालुक्यातील मराठवाडी धरणाच्या लाभक्षेत्रात दहापैकी नऊ बंधार्‍यांची कामे पूर्ण झाली आहेत. शेतकर्‍यांच्या मागणीनुसार मराठवाडीसह साखरी धरणातून त्यामध्ये पाणी सोडण्यात येते. याच पाण्यामुळे परिसरात बागायताचे क्षेत्र वाढले आहे. दरवर्षी पावसाळ्याच्या तोंडावर पाटबंधारे विभाग बंधार्‍याच्या लोखंडी प्लेटा काढते. पावसाळा संपत आल्यानंतर हिवाळ्यात त्या पुन्हा बसविल्या जातात. यावर्षीही त्यांनी अशी कार्यवाही केली. मात्र, मालदन येथील बंधार्‍याच्या प्लेटमधून गळती सुरु आहे. त्यामुळे पाणी वाहून बंधारा लगेच रिकामा होवू लागला आहे. 

यंदाच्या हंगामात 21 फेब्रुवारी रोजी मराठवाडी धरणातून तिसरे आवर्तन सुरू झाले. परंतू मालदन येथील बंधार्‍याला लागलेल्या गळतीमुळे बंधारा आठवड्यात मोकळा झाला. गुढे, मालदन, ढेबेवाडी, जाधववाडी, पाचुपतेवाडी या परिसरातील शेतकर्‍यांना बंधार्‍यातील पाण्याचा उपयोग होतो. बंधारा रिकामा झाल्याने नदीपात्रात ठिकठिकाणी डबकी साचली असून, शेती पंप उघडे पडले आहेत. पिके वाळत चालल्याने शेतकर्‍यांत काळजीचे वातावरण आहे. पाटबंधारे विभागाने तातडीने बंधार्‍यांची गळती काढून धरणातून पाणी सोडण्याचे नियोजन करावे, अशी मागणी शेतकर्‍यांनी केली आहे.

COMMENTS