Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

चोरट्यांकडून कारखान्यात युवकास मारहाण.

घटना सीसीटीव्ही मध्ये कैद.

भिवंडी  प्रतिनिधी- भिवंडी शहरातील देवजीनगर(Devjinagar) नारपोली(Narpoli) या भागात एका यंत्रमाग कारखान्यात चोरी करण्यासाठी आलेल्या त्रिकुटाने कारखान्या

कर्ज रकमेचा गैरवापर, त्या जमिनीचे व्यवहार थांबवण्याचे आदेश
एकनाथ खडसे यांना हृदयविकाराचा झटका
उद्या भाजपचे साडेतीन लोक तुरुंगात आणि देशमुख बाहेर :राऊत | LOKNews24

भिवंडी  प्रतिनिधी- भिवंडी शहरातील देवजीनगर(Devjinagar) नारपोली(Narpoli) या भागात एका यंत्रमाग कारखान्यात चोरी करण्यासाठी आलेल्या त्रिकुटाने कारखान्यातील युवकास जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला आहे . सुरवातीला एक चोरटा कारखान्यात मोबाईल चोरीसाठी शिरला असता त्याची चाहूल लागताच कारखान्यातील ब्रिजेश विश्वकर्मा(Brijesh Vishwakarma) याने त्यास विरोध केला असता चोरट्याने त्यास मारहाण करण्यास सुरवात केली. त्यानंतर कारखान्यातील ब्रिजेशचे वडील त्याच्या मदतीला आले असता चोरट्याचे बाहेर असलेले दोन साथीदार मदतीला येऊन ब्रिजेश यास बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली . ही संपूर्ण घटना कारखान्यातील सीसीटीव्हीत कैद झाली आहे .परंतु या घटने नंतर चोरटे त्या ठिकाणाहून पसार झाले आहेत. या प्रकरणी नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात येत आहे .

COMMENTS