नाशिक/प्रतिनिधी :आम्ही बंड नाही तर उठाव केला. मात्र आमचा उठाव जर जनतेला पचनी पडला नसता, तर त्यांनी आमच्याकडे तोंड फिरवली असती. मात्र आम्ही सच्चे शिवस
नाशिक/प्रतिनिधी :आम्ही बंड नाही तर उठाव केला. मात्र आमचा उठाव जर जनतेला पचनी पडला नसता, तर त्यांनी आमच्याकडे तोंड फिरवली असती. मात्र आम्ही सच्चे शिवसैनिक आहोत. ज्या दिवशी माझी मुलाखत होईल त्या दिवशी या देशात राजकीय भूकंप होईल, असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. ते आज मालेगावमध्ये एका कार्यक्रमात बोलत होते. यावेळी बोलतांना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, आम्ही धर्मवीरांचे शिष्य आहोत. धर्मवीर आनंद दिघे यांच्याबाबत देखील राजकारण झाले. त्याचा खुलासा लवकरच करणार असल्याचा इशारा देखील त्यांनी यावेळी दिला. या राज्याला विकास निधी कमी पडून देणार नाही असा हा शब्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला आहे. पुढच्या निवडणुकीत शिवसेना-भाजपाचे 200 आमदार निवडून येणार, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. धर्मवीर चित्रपट काही लोकांना पचला नाही. ज्या दिवशी माझी मुलाखत होईल त्या दिवशी या देशात राजकीय भूकंप होईल, असे म्हणत एकनाथ शिंदे यांनी उध्दव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. आम्ही बंडखोरी केली नाही आम्ही क्रांती केली. 50 आमदारांनी उठाव केला. या उठवाची दखल 35 देशांनी घेतली. या गर्दीवरून दिसते की आम्ही घेतलेली भूमिका जनतेने स्वीकारली आहे. ज्या बाळासाहेबांनी हिंदुत्वाची भूमिका घेतली ती आम्ही घेतली. आमची भूमिका वेगळी नाही.
अडीच वर्षाच्या कार्यकाळात जिल्हा प्रमुख, तालूका प्रमुख यांच्यावर तडीपारच्या केसेस झाल्या. तेव्हा मुख्यमंत्री आपले होते. आपल्या शिवसेनेच्या आमदारांना निधी कमी देऊन त्यांचं अतित्व संपविण्याचे काम सुरु होतं. सत्तेतून आम्ही 9 मंत्री पायउतार झालो. काही लोकांना वाटलं एकनाथ शिंदेंनी राजकीय आत्महत्या केली. मात्र, सभागृहात गेल्यावर आम्ही 50 चे 51 झालो. आम्हाला रिक्शावाला, टपरीवाला, भाजीवाला म्हटले गेले. पण, आम्हीच रक्ताचे पाणी करून शिवसेना वाढवली. गद्दारी आम्ही केली, विश्वासघात आम्ही केला. मग, ज्या भाजपा सोबत निवडणूक लढून जिंकलो त्यांना आपण बाजूला सारलं मग विश्वास घात कुणी केला? सावरकरांबद्दल वाईट बोलणार्या काँग्रेसवासोबत आपण सत्तेत बसलात विश्वास घात कुणी केला, असा सवाल त्यांनी उध्दव ठाकरेंना विचारला आहे.
रिक्षाचालक, फेरीवाल्यांसाठी महामंडळाची घोषणा
राज्यातील रिक्षाचालक तसेच फेरीवाल्यांसाठी नव्या आर्थिक विकास महामंडळाची स्थापना केली जाईल, अशी घोषणा एकनाथ शिंदे यांनी केली आहे. शिवसेना-भाजपा युतीचे सरकार राज्याला न्याय देईल. राज्याला पुढे घेऊन जाईल. गोरगरीब जनतेच्या मुलांच्या जीवनात बदल झाला पाहिजे. त्यांची मुलं शिकली पाहिजेत. त्यांच्या परिवाराला वैद्यकीय मदत मिळाली पाहिजे, यासाठी एक आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याची सूचना दादा भुसे यांनी मला केली. आम्ही सर्वांचा विकास करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे मत मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केले.
COMMENTS