अखेर अर्जुन खोतकर शिंदे गटात दाखल

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अखेर अर्जुन खोतकर शिंदे गटात दाखल

निर्णय सांगताना खोतकरांना अश्रू अनावर

जालना/प्रतिनिधी :शिवसेनेचे उपनेते आणि माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतला आहे, त्यामुळे शिवसेनेला पुन्ह

नाशिकच्या सकल मराठा बांधवांकडून सरकार विरोधात बोंबाबोंब आंदोलन  
रानभाज्यांचे महत्व पुढील पिढीपर्यंत पोहचविण्याच्या दृष्टिने महोत्सवाची व्याप्ती वाढविण्यासाठी प्रयत्न करनार : पालकमंत्री दादाजी भुसे
राष्ट्रवादी पक्षाच्या (अजितदादा गट)  त्र्यंबकेश्वर शहराध्यक्ष पदी बंडू खोडे 

जालना/प्रतिनिधी :शिवसेनेचे उपनेते आणि माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतला आहे, त्यामुळे शिवसेनेला पुन्हा हा एक धक्का आहे. पत्रकार परिषद घेत आपण शिंदे गटात जात असल्याचे सांगताच, त्यांना अश्रु अनावर झाले होते. यासंदर्भात शिवसेना पक्षप्रमुख यांना मी माझी अडचण सांगितली आहे. तुम्ही अडचणीत आहात तर निर्णय घेऊ शकता, असं उद्धव ठाकरे म्हणाल्याचे खोतकरांनी सांगितले.
जालना लोकसभा मतदारसंघाचा आग्रह मी सोडलेला नाही, असे खोतकरांनी सांगितले. त्यामुळे भविष्यात केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री आणि भाजप नेते रावसाहेब दानवेंसोबत खोतकरांचा पुन्हा संघर्ष होण्याची शक्यता नाकारता येत नाही. रावसाहेब दानवेंनी मला चहा घ्यायला बोलावलं, अडीच वर्षांनी आम्ही बोललो, दुश्मन जरी असला, तरी चहा घ्यायला बोलावल्यावर आपण जातो. त्यावेळी ओघाने विषय आले, मी म्हटले लोकसभेला तुम्ही मला समर्थन द्या, मला लोकसभा लढवायची आहे. तुम्ही दोन वेळा लढताय, एक वेळा मला द्या, तर ते म्हणाले, ती जागा तुम्हाला कशी सुटेल, तिथे भाजपचा मी स्टँडिंग खासदार आहे, मग असे करा, हा निर्णय शिंदे-फडणवीसांवर टाका, पण मी लोकसभेच्या जागेचा आग्रह सोडलेला नाही, असे खोतकरांनी स्पष्ट केले.

साखर कारखाना प्रकरणात सहकार्य करण्याचे आश्‍वासन
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी मी बोललो, त्यांनी साखर कारखाना प्रकरणात पूर्ण सहकार्य करण्याचे आश्‍वासन दिलं. जालना शहरातील पिण्याच्या पाण्याचा, रस्त्याचा प्रश्‍न गंभीर आहे, गौतम बुद्ध पुतळ्याचाही मुद्दा आहे, त्याविषयी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. आज सकाळी पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंशी सविस्तर बोलणं झालं. माझ्यावर आलेली परिस्थिती मी त्यांच्या कानावर घातली. संजय राऊत, विनोद घोसाळकरांशीही बोललो, जिल्ह्यातील नेत्यांशीही बोललो. मी 40 वर्षांपासून सच्चा शिवसैनिक आहे, पण घरी आले की परिवार दिसतो, त्यामुळे काही निर्णय घेणे गरजेचे आहे. या पार्श्‍वभूमीवर पक्षप्रमुखांकडे मी परवानगी मागितली, ते जे बोलायचे ते बोलले. त्यामुळे आज सर्वांच्या साक्षीने, शिवसैनिकांच्या साक्षीने मी एकनाथ शिंदे यांचे समर्थन करण्याचा निर्णय घेतलेला आहे. असे अर्जुन खोतकर म्हणाले.

COMMENTS